शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणातील आरोपीचे नाव लगेच जाहीर करणे थांबवावे

By admin | Updated: March 30, 2016 03:03 IST

बलात्काराच्या तक्रारीची प्राथमिक चौकशी पूर्ण होतपर्यंत किंवा तपास अधिकारी लिखित स्वरूपात परवानगी देतपर्यंत वृत्तवाहिन्यांनी व वर्तमानपत्रांनी आरोपीचे नाव जाहीर करू नये,

हायकोर्टात याचिका : तक्रारीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचीही विनंतीनागपूर : बलात्काराच्या तक्रारीची प्राथमिक चौकशी पूर्ण होतपर्यंत किंवा तपास अधिकारी लिखित स्वरूपात परवानगी देतपर्यंत वृत्तवाहिन्यांनी व वर्तमानपत्रांनी आरोपीचे नाव जाहीर करू नये, महिलेच्या तक्रारीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे आणि तक्रार खोटी आढळून आल्यास संबंधित महिला कारवाईस पात्र राहील असा नवीन नियम छापील ‘एफआयआर’मध्ये समाविष्ट करण्यात यावा अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.याचिकेत केंद्रीय माहिती व प्रसारण विभाग, प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया, राज्य शासनाच्या गृह विभागाचे सचिव, पोलीस आयुक्त व अजनी पोलीस निरीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.राजेंद्र पडोळे असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते व्यावसायिक आहेत. त्यांच्याविरुद्ध एका महिलेने २७ जुलै २०१५ रोजी अजनी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदविली आहे. ही तक्रार खोटी असल्याचा व महिलेने ५५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी ही तक्रार नोंदविल्याचा पडोळे यांचा दावा आहे. त्यांनी खंडणीच्या तक्रारीची सीबीआय किंवा सीआयडीमार्फत चौकशी करण्यासाठी व महिलेच्या खोट्या तक्रारीमुळे झालेल्या मानसिक त्रासाचा मोबदला मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासोबतच त्यांनी व्यापक दृष्टिकोनातून वरील विनंतीही न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास व अ‍ॅड. लुबेश मेश्राम यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)बलात्काराच्या खोट्या तक्रारी वाढल्यागेल्या काही वर्षांपासून बलात्काराच्या खोट्या तक्रारी करण्याचे प्रमाण वाढले आहे. विविध हेतूने या तक्रारी केल्या जातात. याप्रकरणात आरोपीविरुद्ध ताबडतोब एफआयआर नोंदविणे बंधनकारक आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदविल्यानंतर प्रसारमाध्यमांद्वारे बातम्या प्रसारित केल्या जातात. यामुळे आरोपीला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. समाजामध्ये त्याची बदनामी होते. यानंतर आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटला तरी, त्याची पूर्वीची प्रतिष्ठा परत येत नाही. समाज त्याच्याकडे चांगल्या नजरेने पहात नाही. त्याला जगणे असह्य होऊन जाते. परिणामी ही याचिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.