शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोरीची स्प्लेंडर, लॅपटॉप जप्त

By admin | Updated: February 28, 2017 23:43 IST

पाचपावली पोलिसांनी गेल्या दोन दिवसात चार सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकीसह ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ऑनलाइन लोकमत 
नागपूर, दि. 28 - पाचपावली पोलिसांनी गेल्या दोन दिवसात चार सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकीसह ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
हवलदार संजय वानखेडे हे आपल्या तपास पथकातील सहका-यांसह गस्त करीत असताना सोमवारी  त्यांना चार खंबा चौकात  मोहम्मद सरफराज अब्दुल सत्तार अंसारी (वय ३०,  रा.पिवळी नदी, संघर्ष नगर) हा संशयास्पद अवस्थेत उभा दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्याजवळ असलेली स्प्लेंडर दुचाकी महेंद्रनगरातून चोरल्याची कबुली दिली. यासोबतच आरोपी सरफराजने मोहम्मद रफी चौकाजवळच्या जयप्रकाश हाउसिंग सोसायटीतील एका घरातून लॅपटॉप आणि मोबाईल चोरल्याचेही कबुल केले. पोलिसांनी आरोपीकडून दुचाकी, लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला.  
 अशाच प्रकारे रविवारी पहाटे २ वाजता मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळ हवलदार सय्यद सलिम आणि त्यांच्या सहका-यांनी संशयावरून मोहम्मद इम्तियाज मोहम्मद वकिल (वय २१),  नसिम अहमद शफी अहमद (वय २१, दोघेही रा. अंसारनगर) आणि त्यांनी दिलेल्या माहितीनंतर शेख साजिद शेख प्यारे साहाब (रा मोमिनपुरा) याला अटक करून त्यांच्याकडून पाचपावलीतील एका लॉटरी सेंटरमध्ये झालेल्या टीव्ही चोरीचा तसेच किराणा दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.  इम्तियाज आणि नसिमकडून चोरीचा टीव्ही तसेच  शेख साजिद कडून किराणा दुकानात चोरलेल्या ४ हजार रुपये आणि अन्य साहित्यापैकी  ८०० रुपये तसेच  चिजवस्तूंसह १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे, उपनिरीक्षक पी. आर. इंगळे, डी. एम. राठोड, हवलदार संजय वानखेडे, सय्यद सलिम, नायक सारिपुत्र फुलझेले, अविराज भागवत, शैलेन्द्र चौधरी, सचिन भिमटे, विजय जाने, सुनिल वानखेडे आणि  शंभुसिंग यांनी ही कामगिरी बजावली.