शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नातेसंबंधांना काळिमा

By admin | Updated: August 30, 2014 02:41 IST

जरीपटका येथील दोन अल्पवयीन मुलींना जन्मदाता पिता आणि भावानेच लैंगिक शोषण करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नागपूर : जरीपटका येथील दोन अल्पवयीन मुलींना जन्मदाता पिता आणि भावानेच लैंगिक शोषण करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नातेसंबंधांना काळे फासणाऱ्या या घटनांनी नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. आरोपी पिता एका कारखान्यात मजुरी करतो. त्याचे दोन लग्न झाले आहे. पहिल्या पत्नीपासून त्याला १४ वर्षीय पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा आहे. आरोपी पिता हा मुलीला जेवणाचा डबा घेऊन कारखान्यात बोलवायचा आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. अनेक दिवस हा प्रकार सुरू होता. पीडित मुलीच्या भावाने हा प्रकार पाहिला तेव्हा त्याने बहिणीला वाचविण्याऐवजी तो सुद्धा तिला धमकावित तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला. मागील सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. यादरम्यान पीडित मुलीला दिवस गेले. सूत्रानुसार काही दिवसांपूर्वीच पीडित मुलीच्या आईच्या हा प्रकार लक्षात आला. परंतु बदनामीच्या भीतीने ती चूप होती. गुरुवारी पीडित मुलीला दिवस गेल्याचे परिसरातील नागरिकांना समजले. तेव्हा ते संतापले आणि त्यांनी पिता-पुत्राची धुलाई केली. दोन्ही आरोपींना पकडून यशोधरानगर पोलीस ठाण्यात आणले. घटनास्थळ लक्षात घेता त्यांना जरीपटका पोलिसांकडे सोपविण्यात आले. पीडित मुलीची विचारपूस केल्यानंतर तिच्या आईने तक्रार दाखल केली. त्या आधारावर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दुसरी घटना जरीपटका हद्दीतच गुरुवारी दुपारी घडली. पीडित १० वर्षीय मुलगी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घरी होती. त्यावेळी घरी तिचे वडील होते. आई कामावर गेली होती. यादरम्यान वडिलाने मुलीवर बळजबरी केली. आई घरी आल्यावर मुलीच्या व्यवहारावरून तिला संशय आला. विचारपूस केली असता मुलीने घडलेली घटना सांगितली. तिच्या आईने शुक्रवारी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)