नागपूर : १९७३ साली जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या एका ऐतिहासिक आंदाेलनाची आठवण आज नागपूरकरांना हाेइल. अजनी वनातील झाडांसाठी एक माेठे पाऊल तरुण पर्यावरणप्रेमी उचलणार आहेत. रविवारी शेकडाे तरुण झाडांना कवटाळून चिपकाे आंदाेलन करणार आहेत. वृक्षताेडीला विराेध करण्यासाठी सध्या हे प्रतीकात्मक आंदाेलन असेल पण प्रशासन झाडे ताेडायला आले त्यावेळी असेच खरे आंदाेलन करण्याचा इशारा या तरुणांनी दिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (एनएचएआय) प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशनसाठी अजनी रेल्वे काॅलनी परिसरातील हजाराे झाडांची कत्तल केली जाणार आहे. याविराेधात रविवारी चिपकाे आंदाेलनाची घाेषणा युथ फाॅर चेंजच्या तरुणांनी केली आहे. यासाठी साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात जनजागृती करून लाेकांना यात सहभागी हाेण्याचे आवाहन केले जात आहे. रविवारी सकाळी ७ वाजतापासून अजनी काॅलनी परिसरात हे आंदाेलन सुरू हाेणार आहे. शेकडाेच्या वर तरुण पर्यावरणवादी व नागरिक यामध्ये सहभागी हाेणार असल्याचे कुणाल माैर्य या तरुणाने सांगितले.
पाेस्टकार्ड आंदाेलनही आज
चिपकाे आंदाेलन समाप्त हाेताच तरुणांच्या दुसऱ्या टीमद्वारे रेल्वे मेन्स शाळेसमाेर पाेस्टकार्ड आंदाेलन केले जाणार आहे. अनिकेत कुत्तरमारे याच्या नेतृत्वात हे आंदाेलन हाेइल. याअंतर्गत तरुणांनी पाेस्ट ऑफिसमधून ५००० वर पाेस्टकार्ड खरेदी केले आहेत. हे पाेस्टकार्ड केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले जाणार आहेत. माॅडेल स्टेशन प्रकल्पासाठी हजाराे झाडे ताेडली जाणार आहेत शिवाय शाळाही ताेडली जाणार आहे. वृक्षताेड थांबविण्यासाठी व शाळा वाचविण्यासाठी नितीन गडकरी यांना पत्राद्वारे विनंती केली जाणार असल्याचे अनिकेतने सांगितले.
शाॅर्ट फिल्ममधून भावनिक आवाहन
अजनी वन परिसरात हाेत असलेल्या घडामाेडीबाबत वेगवेगळ्या माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. याअंतर्गत तरुण कार्यकर्त्यांनी अतिशय भावनिक शाॅर्टफिल्म तयार केली आहे. या परिसरात बालपण घालविलेल्या तरुणांच्या आठवणींना केंद्रबिंदू ठेवून या झाडांची कत्तल थांबविण्यासाठी भावनिक आवाहन यातून केले जात आहे. आंदाेलन करणाऱ्या तरुणांनीच ही फिल्म तयार केली असून अभिनयही त्यांनीच केला आहे. या लघुपटातून कापल्या जाणाऱ्या झाडांचे दु:ख मांडले असून पाहणाऱ्यांच्या डाेळ्यांच्या पापण्या ओल्या करते.