शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

नागपुरात  अडीच महिन्यात ११४१ श्वानांवर नसबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:10 IST

नागपूर शहरात ९० हजार बेवारस श्वान असून, त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोकाट श्वानांनी चावा घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने याला आळा घालण्यासाठी महापालिकेने नसबंदी शस्त्रक्रिया मोहीम हाती घेतली आहे. गेल्या तीन महिन्यात ११४१ श्वानांवर नसबंदी करण्यात आली.

ठळक मुद्देगती वाढविण्याची गरज : तरच शहरातील नागरिकांना मिळेल दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात ९० हजार बेवारस श्वान असून, त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोकाट श्वानांनी चावा घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने याला आळा घालण्यासाठी महापालिकेने नसबंदी शस्त्रक्रिया मोहीम हाती घेतली आहे. गेल्या तीन महिन्यात ११४१ श्वानांवर नसबंदी करण्यात आली.महाराज बाग समोरील पशुसंवर्धन विभागाच्या पशु रुग्णालयात नसबंदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. नसबंदीची जबाबदारी व्हेट्स फॉर अ‍ॅनिमल्स रिकगनाईज बाय अ‍ॅनिमल या संस्थेकडे सोपविली आहे. दररोज १५ ते २० श्वानांवर नसबंदी होत आहे. १४ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या अडीच महिन्यात ११४१ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. फेबु्रवारी महिन्यात २२३, मार्चमध्ये ५३३ तर एप्रिल महिन्यात ५८५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र शहरातील मोकाट श्वानांची संख्या विचारात घेता याची गती वाढविण्याची गरज आहे.पालकमंत्र्यांच्या जनसंवाद कार्यक्रमातही मोकाट डुकरे व श्वानाबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. त्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्यानुसार डुकरे पकडण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. तसेच शहरातील मोकाट श्वानांवर नसबंदी केली जात आहे.पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशन परिसर, बसस्थानक, विमानतळ व बाजार भागातील श्वानांवर लक्ष केंद्रित करण्यात असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.‘डॉग रुल २००१’नुसार मोकाट श्वानांना पकडून दुसरीकडे सोडता येत नाही. त्यामुळे मोकाट श्वानांना आळा घालण्यासाठी नसबंदी व उपचार हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. २००१ चा मोकाट श्वानांबाबतचा कायदा व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे मोकाट श्वानांना पकडून दुसरीकडे नेता येत नाही. तसेच पशुप्रेमी कायद्याचा आधार घेत श्वानांना पकडण्याला विरोध दर्शवितात. दुसरीकडे सक्षम यंत्रणा नव्हती. यामुळे महापालिकेचा कोंडवाडा विभाग हतबल असल्याचे चित्र मागील काही वर्षांत निर्माण झाले होते. नसबंदी मोहिमेमुळे मोकाट श्वानांना काही प्रमाणात आळा बसण्याला मदत झाली आहे.

टॅग्स :dogकुत्राNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका