शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १०० एसटी बसेसला ‘स्टील बॉडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:55 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसला अ‍ॅल्युमिनियमऐवजी स्टील बॉडी देण्यात येत असून विभागातील १०० बसेसला स्टील बॉडीत रुपांतरीत करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात जुन्या बसेसमध्ये खडखड आवाज येणार नाही, हे विशेष.

ठळक मुद्देसुरक्षित प्रवासासाठी निर्णय तीन वर्षांपासून होतोय बदल

वसीम कुरेशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसला अ‍ॅल्युमिनियमऐवजी स्टील बॉडी देण्यात येत असून विभागातील १०० बसेसला स्टील बॉडीत रुपांतरीत करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात जुन्या बसेसमध्ये खडखड आवाज येणार नाही, हे विशेष.एटी महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसटीच्या हिंगणा, नागपूर, औरंगाबाद, डोबाडी, पुणे येथील केंद्रीय कार्यशाळेत जुन्या बसेसला स्टील बॉडीत रुपांतर करण्याचे काम सुरू आहे. नागपूर विभागात १०० बसेसला स्टीलची बॉडी देण्यात आली आहे. अनेक अपघातात अ‍ॅल्युमिनियमची बॉडी लवचिक असल्यामुळे बसचे अधिक नुकसान होते. यात प्रवाशांची जीवितहानी अधिक होते. याशिवाय ‘अ‍ॅल्युमिनियम पॅनल रिपीट’ प्रवासात निघून बसेसमध्ये खडखड आवाज येतो. स्टील बॉडीत ही समस्या येत नसून अपघातातही अधिक नुकसान होत नाही. स्टील बॉडीत बसच्या सीटला आरामदायी बनविण्यात आले आहे. अ‍ॅल्युमिनियमची बॉडी असल्यामुळे सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतु आता एसटी महामंडळ खासगी बसेसच्या तुलनेत स्टील बॉडीच्या बसेस रस्त्यावर उतरवित आहे. बसेसला स्टील बॉडीत रुपांतरीत करण्याचे काम तीन वर्षांपासून करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. लोखंडाची बॉडी असल्यामुळे बसेसचे अ‍ॅव्हरेज कमी मिळत होते. परंतु स्टील बॉडीमुळे अधिक अ‍ॅव्हरेज मिळणार आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य‘एसटीच्या प्रवासात प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे. याच बाबीकडे लक्ष देऊन एसटी बसेसला स्टील बॉडीत रुपांतरीत करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने जुन्या बसेस स्टील बॉडीत रुपांतरित करण्यात येतील.’अशोक वरठे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक