शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या चौकटीत राहून नवमाध्यमांत व्यक्त व्हावे

By admin | Updated: February 27, 2017 02:11 IST

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय संविधान दिले आहे.

माहिती आयुक्त दिलीप धारुरकर : जनसंवाद विभागात परिषद नागपूर : अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय संविधान दिले आहे. या संविधानाच्या चौकटीत राहून नवमाध्यमांनी व्यक्त झाल्यास त्याचा लोकशाहीच्या बळकटीकरणास नक्कीच उपयोग होईल, असे प्रतिपादन नागपूर विभाग माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी केले. ते वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पूरणचंद मेश्राम, टीव्ही पत्रकार सरिता कौशिक, विभागप्रमुख डॉ. धर्मेश धवनकर यांची उपस्थिती होती. काळानुरूप माध्यमांमध्ये स्थित्यंतरे होत असताना एक पत्रकार म्हणून आपण त्याची चर्चा केली पाहिजे. तसेच त्या स्थित्यंतरांचे समाजावर होणाऱ्या परिणामांची समीक्षा करणेही गरजेचे असते. पत्रकारांनी समीक्षा न केल्यास समाजातील इतर घटक त्याची समीक्षा करतात, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मराठी पत्रकारितेत अनेकवेळा स्थित्यंतरे आली आणि सामाजिक चळवळीही त्याच वेळी घडून गेल्या, असे दिलीप धारुरकर यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे. लोकशाहीचे भवितव्य त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यावरील मर्यादांची जाणीव असणे आणि ती करून देणे हेही तितकेच आवश्यक आहे. सोशल मीडियावर शब्द जपून वापरावेत, अवमानकारक, इतरांना दुखावणारे, महापुरुषांची अवमानना करणारी भाषा वापरू नये. तसेच बेजबाबदार आणि अविश्वसनीय, अंधश्रद्धा पसरवणारे आणि आक्षेपार्ह प्रकटीकरणही लोकशाही आणि सुदृढ समाजासाठी घातक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुलसचिव डॉ. पूरणचंद मेश्राम यांनी नवमाध्यमे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा महोत्सव असल्याचे सांगून, यासोबत आपल्या सर्वांवर लोकशाही मजबूत ठेवण्याची मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यमान स्थितीत पत्रकारांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे मर्यादित स्वरूपात व्यक्त करावे लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सुदृढ लोकशाही अपेक्षित होती. ती प्रस्थापित न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान देशाला समर्पित करताना म्हटले होते, असेही डॉ. पूरणचंद मेश्राम यांनी यावेळी सांगितले.(प्रतिनिधी)