शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

एसटीच्या विश्रामगृहात समस्यांचा मुक्काम

By admin | Updated: May 22, 2015 02:55 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन खेड्यापाड्यात जाणाऱ्या एसटीमुळे महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे.

दयानंद पाईकराव नागपूर प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन खेड्यापाड्यात जाणाऱ्या एसटीमुळे महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे. परंतु प्रवाशांची खऱ्या अर्थाने सेवा करणारे एसटीचे चालक-वाहकच समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. त्यांच्यासाठी असलेल्या विश्रांतीगृहात सुविधांपेक्षा समस्याच अधिक असल्यामुळे थोडी विश्रांती तर सोडा या विश्रामगृहात बसण्याची इच्छा होणार नाही, अशी येथील स्थिती असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून स्पष्ट झाले.महाराष्ट्रातील प्रवाशांना सुविधा देण्यात एसटी महामंडळ अग्रेसर आहे. परंतु एसटीचा कणा असलेल्या चालक वाहकांनाच समस्यांना तोंड देण्याची पाळी आली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती गणेशपेठ बसस्थानकावर चालक-वाहकांना विश्रांती घेण्यासाठी विश्रांतीगृह आहे. नागपुरात विविध जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणावरून चालक-वाहक येतात. त्यांना विश्रांती घेण्यासाठी या विश्रांतीगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु या विश्रांतीगृहात सुविधा कमी आणि समस्याच अधिक आहेत. विश्रांतीगृहाची अवस्था जाणून घेतली असता तेथे उपस्थित चालक-वाहकांनी समस्यांचा पाढाच वाचला. विश्रांतीगृहात कर्मचाऱ्यांसाठी भोजनकक्ष आहे. परंतु या भोजनकक्षाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. भोजनकक्षात स्वच्छ वातावरणाऐवजी कचऱ्याचा ढीग साचल्याचे दृश्य दिसले. स्वच्छतागृहातही कमालीची दुर्गंधी येत होती. बाहेरगावावरून येणाऱ्या चालक-वाहकांना झोपण्यासाठी मोठा हॉल आहे. परंतु या हॉलमध्ये साध्या सतरंजीची सोय करण्यात आलेली नव्हती. हॉलमधील फरशीवर प्रचंड घाण साचलेली होती. याच स्थितीत कर्मचाऱ्यांना येथे विश्रांती करावी लागत आहे. दुपारी ३ वाजता या हॉलच्या बाजूला असलेल्या माठातून पिण्याचे पाणी घेण्यासाठी एक कर्मचारी आला असता माठात पाणीच नसल्यामुळे त्याला आल्यापावली परत जाण्याची पाळी आली. याशिवाय या पिण्याच्या माठाजवळ घाण पाणी साचल्याचे दिसले. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागपुरात कडक उन पडत असल्यामुळे या हॉलमध्ये एसटी महामंडळाने किमान एक कुलर लावण्याची गरज होती. परंतु कुलरची व्यवस्थाच येथे नसल्यामुळे उकाड्यात विश्रांती करण्याची पाळी कर्मचाऱ्यांवर आली आहे.