शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषद निवडणुकीवर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:52 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीवर अंतरिम स्थगिती दिली. निर्धारित निवडणूक प्रक्रियेचे काटेकोर पालन झाले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्यामुळे ही स्थगिती देण्यात आली. तसेच, विद्यापीठाचे कुलसचिव व कुलगुरू यांना नोटीस बजावून १३ आॅगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीवर अंतरिम स्थगिती दिली. निर्धारित निवडणूक प्रक्रियेचे काटेकोर पालन झाले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्यामुळे ही स्थगिती देण्यात आली. तसेच, विद्यापीठाचे कुलसचिव व कुलगुरू यांना नोटीस बजावून १३ आॅगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.यासंदर्भात डॉ. भीमराव वाघमारे व इतर सिनेट सदस्यांनी उच्च न्यायालयात दोन रिट याचिका दाखल केल्या आहेत. निर्धारित निवडणूक प्रक्रियेनुसार मतदानाच्या तारखेपासून ४५ दिवस आधी प्राथमिक मतदार यादी जाहीर करणे आवश्यक आहे. प्राथमिक मतदार यादीवर कुलसचिवांकडे आक्षेप नोंदविण्यासाठी पाच दिवसांची मुदत द्यायला पाहिले. तसेच, कुलसचिवांच्या आदेशाविरुद्ध कुलगुरूंकडे अपील करण्याची संधी मिळायला हवी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदानाच्या तारखेपासून ३० दिवसांपूर्वी अंतिम मतदार यादी जाहीर करणे अनिवार्य आहे. परंतु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीसाठी २१ जुलै २०१८ रोजी मतदार यादी जाहीर करण्यात आली व ११ आॅगस्ट २०१८ रोजी मतदान ठेवण्यात आले. परिणामी, संपूर्ण निवडणूक कार्यक्रम अवैध असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, अ‍ॅड. अनिल किलोर व अ‍ॅड. अश्फाक शेख यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयuniversityविद्यापीठ