शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते बांधणीबाबत राज्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा :मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 20:41 IST

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात आधुनिक, शाश्वत व सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘जिथे रस्ते तिथे समृद्धी’ ही विकासाची नवीन संकल्पना निर्माण झाली असून, रस्ते बांधणीबाबत राज्यांनी केंद्राकडे सतत पाठपुरावा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशातील विविध राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

ठळक मुद्देविविध राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात आधुनिक, शाश्वत व सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘जिथे रस्ते तिथे समृद्धी’ ही विकासाची नवीन संकल्पना निर्माण झाली असून, रस्ते बांधणीबाबत राज्यांनी केंद्राकडे सतत पाठपुरावा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.देशातील विविध राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्र्रकात पाटील, गोव्याचे रामकृष्ण ढवळीकर, कर्नाटकचे एच. डी. रेवण्णा, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्र्र शासन देशभरात रस्ते बांधणीला प्राधान्य देत आहे. रस्ते हे विकास प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी राज्यातील रस्तेबांधणीवर भर द्यावा. तसेच केंद्र शासनाला निधीसाठी सहभागी करुन घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्ते बांधकामातील भूसंपादन करताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याची माहिती दिली. तसेच जानेवारीमध्ये महाराष्ट्रात रस्ते बांधकामातील रस्ते सुरक्षा आणि घ्यायची काळजी याबाबत माहिती दिली.प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रस्त्यांचे जीवनमान वाढविणार : नितीन गडकरीप्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील रस्त्यांचे जीवनमान वाढविण्यावर केंद्र शासनाचा भर आहे. त्यामुळे जगातील नवनवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरातून हे शक्य होणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.गोव्यात सर्व्हिस रोडचेही सिमेंटीकरण आवश्यक : रामकृष्ण ढवळीकरगोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रामकृष्ण ढवळीकर यांनीसांगितले की, गोव्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे येथील मुख्य रस्त्यांसोबतच सर्व्हिस रोडचेही सिमेंट काँक्रीटीकरण करणे आवश्यक आहे. यावेळी कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एच. डी. रेवण्णा यांनी कर्नाटकातील रस्त्यांबाबतची स्थिती आणि रस्ते बांधणीच्या कामात येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. त्यात मुख्य रस्ते आणि त्याचे सर्व्हिस रोड यांच्या बांधकामातील रुंदी तसेच त्याबाबतचे निकषांबाबत चर्चा केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpwdसार्वजनिक बांधकाम विभाग