शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वन्यजीवांच्या डीएनएची तपासणी आता नागपुरात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील वन्यजीवांच्या डीएनएची तपासणी आता नागपुरातही करता येईल. राज्य सरकारने सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील वन्यजीवांच्या डीएनएची तपासणी आता नागपुरातही करता येईल. राज्य सरकारने सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा केली. नागपूर येथील प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये ‘वन्यजीव डीएनए तंत्रज्ञान विभाग’ सुरू करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली. वन्यक्षेत्रांमध्ये वाघ आणि बिबट्यांची आपसात लढाई होऊन त्यांचा मृत्यू होणे, त्यांची शिकार होणे किंवा अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यावर पोस्टमार्टमसोबतच त्यांच्या डीएनएची तपासणीही केली जाते. अनेकदा वाघ, वाघिणीच्या मृत्यूनंतर त्यांच्यापासून दुरावलेल्या छाव्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए तपासणीचे विशेष महत्त्व आहे. परंतु आतापर्यंत ही तपासणी महाराष्ट्रात होत नव्हती. वन्यजीवांचे रक्त नमुने हैदराबादच्या सीसीएमबी प्रयोगशाळेत पाठविले जातात. तिथे नमुने पाठविण्याचा खर्च आणि तपासणीचा खर्चही अधिक येतो. तसेच वन विभागाला एकेक नमुन्याचा अहवाल यायला दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागते.

बॉक्स

वेळ आणि पैशाची होणार बचत

राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांनी सांगितले की, सरकारच्या या निर्णयामुळे वन विभागाला मोठी मदत मिळेल. यामुळे डीएनएची तपासणी नागपुरात होईल. त्याचा अहवाल येण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यावर होणारा खर्च वाचेल.

बॉक्स

विषाची होते तपासणी

नागपूरच्या प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये सध्या वन्यजीवांना विष देऊन मारले असेल तर त्याची तापसणी केली जाते. यामुळे वन्यप्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात मदत मिळते.

बॉक्स

‘गोंडवाना थीम पार्क’ही होणार

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात ‘गोंडवाना थीम पार्क’ व इतर सफारीलाही हिरवी झेंडी मिळाली आहे. गोरेवाडाचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद पंचभाई यांच्यानुसार वॉकिंग ट्रेल भागात गोंड व्हिलेज बनविण्यात आले आहे. आता ऑर्कियॉलॉजिकल पार्कसह गोंड राज्यकालीन पेंटिंग्स व साहित्य, वस्तूंसह थीम पार्क निर्देशानुसार तयार करण्यात येईल.