शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत राज्य कुणाचे

By admin | Updated: October 7, 2015 03:17 IST

नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचाही पदभार आहे. त्यामुळे त्यांच्या होमटाऊनमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चांगली असावी.

क्राईम ग्राफ वाढतोय : पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही लोकमत विशेषनागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचाही पदभार आहे. त्यामुळे त्यांच्या होमटाऊनमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चांगली असावी. येथील पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क असायला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीतील गुन्हेगारी उफाळल्यासारखी झाली आहे. गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव सध्या आजारी रजेवर आहेत. २६/११ च्या हल्ल्यात मोलाची भूमिका वठविणारे राजवर्धन सिन्हा यांच्याकडे आयुक्तांचा प्रभार आहे. त्यांच्या साथीला शांतपणे कोणतीही स्थिती हाताळण्याचे कसब असलेले अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आहेत. अभिनाशकुमार, इशू सिंधू, दीपाली मासिरकर, रंजन शर्मा, शैलेश बलकवडे सारखे नव्या दमाचे पोलीस उपायुक्त आहेत. असे असूनही शहरातील गुंड, जुगारी आणि बुकी मोकाट सुटल्यासारखी स्थिती आहे, असे का होत आहे, ते कळायला मार्ग नाही.अधिकारी दडपणात आहे का ? गेल्या दोन दिवसांपासूनं नागपुरात असलेले पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्देशून लोकाभिमुख होऊन काम करावे, असे म्हटले आहे. लोकांमध्ये मिसळून काम करा असा सल्ला देतानाच कुणाच्या दडपणात काम करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सुचवले आहे. त्यांच्या या सूचनेत अनेक अर्थ दडले आहेत. त्याचमुळे शहरात अनेक चांगले पोलीस अधिकारी असूनही गुन्हेगारी वाढत असल्याने या अधिकाऱ्यांवर दडपण आहे का, असा प्रश्न चर्चेला आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अनेक मोठ्या कारवायांच्या वेळी काही पोलीस अधिकाऱ्यांवर दडपण आणण्यात आले होते, हे सर्वश्रुत आहे. हे दडपण ‘त्या’ प्रकरणापुरतेच होते की कायम या अधिकाऱ्यांना दडपणात ठेवण्यात येते, की हे अधिकारीच आता ‘कुछ कर दिखाना नही’, अशा मानसिकतेतून जात आहे, ते तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे, पण... राज्याप्रमाणेच मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वत:च्या गृहशहराकडेही लक्ष आहे. येथील वातावरण चांगले राहावे, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ते खास नजर ठेवून असतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याची प्रचितीही आली. दहशतवादी हल्ला किंवा जातीय दंगलीचा धोका असल्यामुळे त्यांनी नागपूरवर बारीक लक्ष ठेवले होते. येथे राज्याचे अतिरिक्त महासंचालक (स्पेशल आॅपरेशन) बिपीन बिहारी यांना येथे खास पाठवले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी असेच लक्ष नेहमी ठेवण्याची गरज आहे. शहरातील निष्क्रिय, भ्रष्टाचारी पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला गेला, त्यांचे रिपोर्ट कार्ड तपासले गेले तरच गुन्हेगारांची पिलावळ वळवळणार नाही. खून, बलात्कार, खंडणी वसुलीसारखे गंभीर गुन्हे करण्यासोबत पत्रकारांवर हल्ले करण्याची, धमकी देण्याची, सामान्यजनांची वाहने जाळण्याची, उद्योजकांवर हल्ले करण्याची गुंड हिंमत करणार नाहीत.येथे मिळाले यश!एकीकडे गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असताना पोलिसांनी केलेल्या चांगल्या प्रयत्नांमुळे शहरातील चेनस्रॅचिंगच्या घटना मात्र कमी झाल्या आहेत. गेल्या काही वर्षात नागपुरात चेनस्रॅचर्सनी अक्षरश: हैदोस घातला होता. दरदिवशी किमान दोन ते तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडत होत्या. परिणामी महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी नियोजनपूर्ण कारवाई केल्यामुळे चेनस्रॅचिंगच्या घटनांमध्ये उल्लेखनीय घट झाली आहे. त्यामुळे या बाबतीत पोलीस प्रशंसेला पात्र ठरतात.