शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

बौद्धाच्या सामाजिक परिवर्तनाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 07:34 IST

Nagpur News डॉ. बाबासाहेबांनी स्वतः केलेले धर्मांतर आणि त्यांनी दलितांना दिलेली दीक्षा ही रूढ अर्थाने केवळ धार्मिक अदलाबदल नव्हती. आपण केलेल्या कार्याचा परिणाम म्हणून दलितांना नंतरच्या काळात समृद्धीचे दिवस येणार आहेत; मात्र त्यांनी समृद्ध जीवनाचा मार्ग कसा, याचे डॉ. बाबासाहेबांनी केलेले दिशादिग्दर्शन म्हणजे त्यांनी दिलेली ही धम्मदीक्षा होय.

 

नागपूर: शतकानुशतके मुर्दाड झालेल्या समाजात नव स्फुलिंग चेतवण्याचे आणि तो समाज खऱ्या अर्थाने जिवंत करण्याचे काम डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आपला समाज अन्य लोकांप्रमाणेच मानाने जगला पाहिजे, ही त्यांची तळमळ केवळ विचारात राहिलेली नव्हती, तर त्यांनी केलेल्या कामातून त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली. त्यांनी आपल्या समाजाला केवळ जगण्याची भौतिक साधनेच दिलेली नाहीत, तर अर्थपूर्ण जगण्यासाठी तमाम दलित बांधवांना या अंधाऱ्या जगातून बाहेर काढण्यासाठी दृष्टीही बहाल केली. प्रकांड बुद्धीमत्ता आणि प्रज्ञा असलेल्या बाबासाहेबांनी दलितांना बुद्धधम्म काय आहे, याची जाणीव करून दिली. अनेक वर्षांचा अभ्यास, वाचन आणि मननानंतर त्यांनी या बुद्ध धम्माची निवड केली. बाबासाहेबांसारखा विद्वान नेता धम्माबाबत मार्गदर्शन करतो आहे, हे जाणून भारतात दलिताच्या रूपाने क्रांतिकारी धार्मिक आणि आध्यात्मिक मन्वंतर घडले.

डॉ. बाबासाहेबांनी स्वतः केलेले धर्मांतर आणि त्यांनी दलितांना दिलेली दीक्षा ही रूढ अर्थाने केवळ धार्मिक अदलाबदल नव्हती. आपण केलेल्या कार्याचा परिणाम म्हणून दलितांना नंतरच्या काळात समृद्धीचे दिवस येणार आहेत; मात्र त्यांनी समृद्ध जीवनाचा मार्ग कसा, याचे डॉ. बाबासाहेबांनी केलेले दिशादिग्दर्शन म्हणजे त्यांनी दिलेली ही धम्मदीक्षा होय. धर्मांतराच्या घटनेला आता ६५ वर्षे होऊन गेलीत. स्वातंत्र्य मिळूनही आपण ७६ वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या समाजाची मंडळी प्रत्यक्षात एकत्र येणे तसे महाकठीण. वास्तविक त्यांनी एकत्र यावे आणि एकत्र काम करावे, अशी आपल्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. त्यांनी ती मान्य केल्यास महाराष्ट्राचे चित्रच पालटू शकते; पण ते पालटू शकणार नाही, कारण मंडळी एकत्र येणार नाहीत, अशी स्थिती आहे. या हताश स्थितीतही मात्र आशेचा किरण आहे. हिंदू धर्माचा त्याग करून बुद्धधम्मात जाणे ही डॉ. बाबासाहेबांची केवळ प्रतिक्रियात्मक भूमिका नव्हती, त्यामागे त्यांचा ठोस सकारात्मक तात्विक दृष्टिकोन होता. १६३६ साली जात निर्मूलन या जातपात तोडक मंडळासाठी तयार केलेल्या ऐतिहासिक भाषणात डॉ. आंबेडकरांनी समाज परिवर्तनाच्या संदर्भात हा सकारात्मक विचार मांडलेला आहे. त्यांचे म्हणणे असे की, कोणत्याही राजकीय क्रांतीच्या अगोदर सामाजिक सुधारणा आणि प्रबोधनाची चळवळ झाल्याचे इतिहासातील दाखले आहेत. उदा. चंद्रगुप्त मौर्याचे साम्राज्य प्रस्थापित होण्यापूर्वी बुद्धांच्या समतावादी तत्त्वाचा उदय आणि विकास झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापण्यापूर्वी संतांची चळवळ झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुसरी महत्त्वाची भूमिका अशी की, समाजव्यवस्थेला एक नैतिक अधिष्ठान व आचारसंहिता लागते. त्यांच्या आधारे समाजाचे व्यवहार चालावेत, अशी अपेक्षा असते. डॉ. बाबासाहेबांना आजच्या काळात सुसंगत अशी नैतिक आचारसंहिता फक्त बुद्धांच्या तत्त्वज्ञानात असल्याची खात्री झाल्यामुळे त्यांनी बुद्ध धम्माचा पर्याय स्वीकारला. धर्मांतरामुळे देशात समाज परिवर्तनाचे एक नवे चक्र सुरू झाले आणि मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या तिन्ही क्षेत्रात धर्मांतराचे दृष्य परिणाम आपण आज पाहत आहोत.

भारतीय समाजव्यवस्थाच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित निर्माण करण्यासाठी बुद्धाचेच तत्त्वज्ञान सुसंगत आहे, ही डॉ. आंबेडकरांची धर्मांतरामागील व्यापक प्रेरणा लक्षात घेतली, तर देशाचे आजचे नेमके चित्र कसे आहे, याचाही आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल. धर्मांतराच्या घटनेला ६५ वर्षे लोटल्यानंतर आज या सगळ्या घडामोडीचे मूल्यामापन कसे करायचे, हा खरा प्रश्न आहे. धर्म विचारात आणि बुद्ध धम्माविषयीच्या चिंतनात आंबेडकरांनी घातलेली भर ही धर्मांतर चळवळीची एक महत्त्वाची निष्पत्ती आहे; पण गेल्या ६५ वर्षात एकूण समाजाचे या तत्त्वचिंतनाकडे फारसे लक्ष गेले नाही. ऐहिक जीवनाचा तात्विक पाया रचणारे तत्त्वज्ञान असे जर बाबासाहेबांच्या धम्मविचारांचे केंद्र मानले तर खुद बाबासाहेबांच्या अनुयायांना हा विचार फारसा पुढे नेता आला नाही. ऐहिक आणि मानसिक गुलामगिरीपासून मुक्तता मिळवणे हा बाबासाहेबांनी मुक्तीचा अर्थ सांगितला; पण बुद्धधम्म उत्तरोत्तर जास्तच कर्मकांड यात अडकून पडत गेला. परकीय भिक्खूंचा वावर आणि प्रभाव वाढला आणि आंबेडकरप्रणित मुक्तीचा प्रवास दुर्लक्षित करण्यात आला.

धर्मांतर चळवळीच्या मूल्यमापनाचा दुसरा मुद्दा संख्यात्मक असू शकतो. महाराष्ट्रातील एकूण दलितांपैकी निम्मे बौद्ध बनले ( २०११ च्या जणगणनेनुसार ६६ टक्के) पण महाराष्ट्राबाहेर मात्र हे प्रमाण फार मर्यादित राहिले. भारतात आजमितीला एकूण लोकसंख्येत बौद्धांचे प्रमाण एक टक्क्याहून कमी आहे. त्यापैकी ज्या राज्यामध्ये पूर्वापार बौद्ध आहेत, त्यांची संख्या एकूण बौद्धांच्या ढोबळमानाने आठ टक्क्यांच्या आसपास भरते. उरलेले सर्व बौद्ध हे धर्मांतरित आहेत, असे मानले तरी महाराष्ट्रातील

बौद्ध भारतातल्या एकूण बौद्धांच्या ७३ टक्के भरतात. जातिव्यवस्थेचा दुर्दैवी प्रभाव असा की खुद्द महाराष्ट्रातही सर्व अस्पृश्य जातींनी धर्मांतराचा निर्णय स्वीकारला नाही. आता अलिकडे ओबीसी आणि भटक्या विमुक्तांमध्ये धर्मांतराचा विचार बिंबविण्याचे प्रयत्न होत आहेत. हा अपवाद वगळला तर दलित्तेतर हिंदूंनी धर्मांतराच्या किंवा बुद्ध धम्म विचाराच्या पर्यायाकडे गंभीर होऊन पाहिलेलेच नाही, असे दिसते. सारा भारत बुद्धमय करण्याची डॉ. बाबासाहेबांची आकांक्षा होती. ती पूर्ण झालेली नाही; पण समतावादी राजकारणाचा भारतातला एक मोठा हिस्सा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बुद्धमय झाला आहे, ही वाटचाल दृष्टीआड करण्यासारखी नक्कीच नाही.

- एल. टी. लवात्रे,

निवृत्त उप-महाप्रबंधक वेकाेलि,

 

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा