शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:24 IST

दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर (राज्य जीएसटी) विभागातील अधिकारी १ जुलैपासून काळ्या फिती लावून निदर्शने करणार आहेत. प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास १७ जुलैपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्यकर (वस्तू व सेवा) राजपत्रित अधिकारी संघटना, नागपूरने दिला आहे.

ठळक मुद्देराज्यात विभागातर्फे ६५ टक्के महसूल संकलन : ३८७२ पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर (राज्य जीएसटी) विभागातील अधिकारी १ जुलैपासून काळ्या फिती लावून निदर्शने करणार आहेत. प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास १७ जुलैपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्यकर (वस्तू व सेवा) राजपत्रित अधिकारी संघटना, नागपूरने दिला आहे.राज्यात एकूण जमा महसुलापैकी ६५ टक्के संकलन राज्य जीएसटी विभागातर्फे करण्यात येते. त्यानंतरही राज्य शासन विभागाच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करीत आहे. संघटनेची सहकार्याची भूमिका असतानाही दोन दशकांपासून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यास शासन चालढकल करीत असल्यामुळे संघटनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.विभागातील विविध संवर्गात एकूण ११७६९ मंजूर पदापैकी सध्या ३८७२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याची संघटनेची मागणी आहे. सन २००७ मध्ये ५.५ लाख व्यापाऱ्यांचा कर प्रशासन करणारा राज्यकर विभाग त्याच मनुष्यबळात सध्या सुमारे १३ लाख व्यापाऱ्यांचे कर प्रशासन करीत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने विभागाच्या पुनर्रचनेकरिता शासनाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालावर सकारात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी आणि राज्यकर अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी केंद्रातील कर संकलन करणाऱ्या समकक्ष अधिकाऱ्यांप्रमाणे करावी, लेखन सामुग्रीची पूर्तता करावी आणि शासनाच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ या धोरणाची पूर्तता करण्यासाठी संगणक सॅप प्रणाली गतिमान करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

टॅग्स :GST Officeमुख्य जीएसटी कार्यालयStrikeसंप