शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी आंदोलनावर राज्य शासनाने तोडगा काढावा : अभाविपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 20:59 IST

कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुद्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून गुरुवारी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांच्या परीक्षांसोबत तडजोड नको

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुद्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून गुरुवारी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कर्मचारी आंदोलनावर राज्य शासनाने त्वरित तोडगा काढावा व लवकरात लवकर परीक्षांचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.अगोदरच कोरोनामुळे परीक्षांना बराच उशीर झाला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा होणे अत्यावश्यक आहे. या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी याच कालावधीत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला शासनाची अनास्था जबाबदार आहे. कर्मचारी हे परीक्षा प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहेत व या आंदोलनामुळे परीक्षा आणि पुढील प्रवेशप्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो. परीक्षेचा ताण व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली असल्याची माहिती महानगर कार्यालय मंत्री संकेत जावळकर यांनी दिली.