शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
2
दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
3
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
4
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
5
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
6
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
7
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
8
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
9
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
10
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
11
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
12
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
13
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
14
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
15
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
16
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
17
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
18
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
19
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
20
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 

राज्य सरकारला हायकोर्टात दहा लाख जमा करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 8:13 PM

अवैध उत्खनन प्रकरणात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना भेदभावपूर्ण भूमिका ठेवल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्यामुळे राज्य सरकारला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दहा लाख रुपये जमा करण्याचा आदेश बुधवारी देण्यात आला. रक्कम जमा करण्यासाठी चार आठवड्याची मुदत देण्यात आली. या आदेशामुळे सरकारला जोरदार दणका बसला.

ठळक मुद्देजोरदार दणका : अवैध उत्खनन प्रकरणातील कारवाईत भेदभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध उत्खनन प्रकरणात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना भेदभावपूर्ण भूमिका ठेवल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्यामुळे राज्य सरकारला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दहा लाख रुपये जमा करण्याचा आदेश बुधवारी देण्यात आला. रक्कम जमा करण्यासाठी चार आठवड्याची मुदत देण्यात आली. या आदेशामुळे सरकारला जोरदार दणका बसला.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा आदेश दिला. तसेच, पुढच्या तारखेला भेदभावपूर्ण कारवाईवर विस्तृत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले. गेल्या ५ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार वन विभागाचे मुख्य सचिव न्यायालयामध्ये व्यक्तिश: उपस्थित झाले होते. सुनावणीदरम्यान, सरकारने विविध कागदपत्रे सादर करून स्वत:ला निष्कलंक सिद्ध करण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु, प्रकरणातील तथ्ये सरकारच्या भेदभावपूर्ण कारवाईकडे बोट दाखवित होते. ते पाहता न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली व १० लाख रुपये जमा करून प्रामाणिकता सिद्ध करण्याचा आदेश दिला.उत्तर उमरेड भागातील पाचगाव वनक्षेत्रात २००२ ते २०१२ या कालावधीत गिट्टीचे अवैध उत्खनन झाले. त्यामुळे सरकारचा २ कोटी ७५ लाख ३४ हजार रुपयांचा महसूल बुडाला. या प्रकरणाच्या चौकशीनंतर दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. तसेच, ६ मे २०१५ रोजी उच्च न्यायालयाने अन्य एका याचिकेमध्ये या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा आदेश दिला. त्यामुळे सहायक वनरक्षक राजेश चोपकर यांनी १० आॅगस्ट २०१५ रोजी कुही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध भादंविच्या कलम ४०९, ३७९, ३४ व भारतीय वन कायद्याच्या कलम ३२ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. आरोपींपैकी वनपाल एल.यू. शेंडे व डी.जी. पवार यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात सरकारच्या भेदभावपूर्ण कारवाईची माहिती देण्यात आली. परिणामी, न्यायालयाने हे प्रकरण जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा तर, सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी बाजू मांडली.असा केला भेदभावउपवनसंरक्षक डॉ. दिलीप गुजर हे प्रकरणात आरोपी होते. ते ३१ आॅक्टोबर २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला नाही. परंतु, त्यांच्यापूर्वी म्हणजे, जानेवारी-२००६ मध्ये सेवानिवृत्त झालेले याचिकाकर्ते शेंडे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला. कारवाईतील हा भेदभाव सरकारच्या अंगलट आला आहे.लोकशाहीवरील विश्वासाला तडेनागरिकांचा लोकशाहीवर विश्वास आहे. परंतु, सरकारी अधिकारी या विश्वासाला तडे देण्याची कृती करीत आहेत. हे अनेक प्रकरणांमध्ये आढळून आले आहे असे मत न्यायालयाने आदेशात व्यक्त करून सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार