शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या साहित्याची राज्य सरकारलाच ॲलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST

आनंद डेकाटे नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे साहित्य संपूर्ण जगात मार्गदर्शक असून या साहित्याला महाराष्ट्रात व देशात ...

आनंद डेकाटे

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे साहित्य संपूर्ण जगात मार्गदर्शक असून या साहित्याला महाराष्ट्रात व देशात इतकेच नव्हे तर परदेशातसुद्धा मोठी मागणी आहे. या साहित्याला प्रचंड विक्रीमूल्य आहे. असे असताना मागील १६ वर्षांपासून बाबासाहेबांचा एकही नवीन खंड प्रकाशित होऊ शकला नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या साहित्याची राज्य सरकारलाच ॲलर्जी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन साहित्याच्या रूपात लोकांपर्यंत पोहोचावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने १५ मार्च १९७६ राेजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. गेल्या ४४ वर्षात केवळ २२ खंड व २ सोर्स मटेरियल एवढीच या समितीची कामगिरी राहिली. २००४ पासून साहित्याचा एकही नवीन खंड प्रकाशित झालेला नाही. शेवटचे दोन खंड एक पत्रव्यवहार आणि दुसरा चित्रमय चरित्राचा खंड प्रकाशित केला. परंतु या दोन्ही खंडात इतक्या चुका करण्यात आल्या की, त्यावरून समितीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. प्रकाशित अनेक खंडांच्या पुनर्मुद्रणाचे कामही १६ वर्षांपासून रखडले आहे. १९८१ साली अर्थशास्त्राचा ७०० पानांचा खंड सहा हा इंग्रजी भाषेतील ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा जगविख्यात ग्रंथ प्रकाशित झाला. गेल्या ४१ वर्षात या इंग्रजी खंडाचे एकदाही पुनर्मुद्रण करण्यात आले नाही. या ग्रंथाचा मराठी अनुवाद करण्याचा निर्णय झाला. अनुवादाचे हस्तलिखित समितीला सादरही झाले परंतु खंड मात्र प्रकाशित झालेला नाही. नवीन सरकार तरी याकडे लक्ष देईल का? असा प्रश्नही लोकांनी उपस्थित केला आहे.

बॉक्स

भाजपच्या काळात ९८ टक्के निधी कपात

साहित्य प्रकाशनासाठी २०१०-१२ या कालावधीत दरवर्षी एक कोटी रुपये मिळाले. २०१३-१६ या कालावधीत ३ काेटी रुपयांची तरतूद करण्यात आली. परंतु २०१६-१७ मध्ये केवळ ४४ लाख ८० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. २०१७-१८ मध्ये ४ लाख २० हजार आणि २०१९-२० मध्ये ४ लाख ८० हजार एवढाच निधी मंजूर झाला. म्हणजेच भाजप सरकारने तब्बल ९५ ते ९८ टक्के निधी कपात केला.

बॉक्स

वर्षभरापासून समितीचे कामकाज ठप्प

२७ जानेवारी २०२० रोजी प्रकाशन समितीवरील अशासकीय सदस्यांची नेमणूक रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे समितीचे कामकाज ठप्प पडले आहे. समितीची अनुवाद, संपादन आणि प्रकाशनाची कामे, संशोधनाची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी समितीचे पुनर्गठन होणे आवश्यक आहे. तेव्हा प्रलंबित सदस्यांची नेमणूक तातडीने करण्याची गरज आहे.

प्रकाश बन्सोड, अध्यक्ष, भारतीय दलित पँथर