शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अठरा वर्षांवरील लसीकरण सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:09 IST

उमरेड : १८ पेक्षा अधिक वय असलेल्यांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची घोषणा करण्यात आली होती. १ मेपासून लसीकरणाचा हा जम्बो ...

उमरेड : १८ पेक्षा अधिक वय असलेल्यांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची घोषणा करण्यात आली होती. १ मेपासून लसीकरणाचा हा जम्बो कार्यक्रम आखण्यात आला होता. यासाठी दोन दिवसांपूर्वीच को-विन अथवा आरोग्य सेतू या अ‍ॅपवर पूर्वनोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळेल, असे सांगितले गेले होते. शासनाच्या या घोषणेनंतर असंख्य तरुणांनी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया केली. ही प्रक्रियाच पूर्ण होत नसल्याने अनेकांची निराशा झाली आहे. लसीचा अपुरा पुरवठा, असे कारण यामागे असून अठरा वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करा, अशी मागणी केली जात आहे.

फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाचा पहिला आणि दुसरा डोस दिला जात आहे. सोबतच अठरा वर्षांवरील फ्रंटलाईन वर्कर आणि व्यावसायिकांना सुद्धा लस दिली जात आहे. असे असले तरी, अठरा वर्षांवरील सर्वांसाठी सुविधा नसल्याने अनेकजण केंद्रावरून परत जात आहेत. नागपूर येथील पाचपावली हॉस्पिटल, आय. जी. आर. हॉस्पिटल आणि आयसोलेशन हॉस्पिटल, तसेच ग्रामीण रुग्णालय काटोल व प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान या पाच ठिकाणीच अठरा वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. नागपूरसह जिल्ह्यात केवळ पाचच ठिकाणी ही सुविधा आहे. अन्य ठिकाणच्या केंद्रात ही सुविधा अद्याप सुरू केलेली नाही. या कारणामुळे नोंदणीची प्रक्रिया सुद्धा अपूर्ण होत आहे.

कधी सुरू होणार?

लसीकरण केंद्रावर नागरिकांसाठी लेखी सूचना प्रसारित करण्यात आली आहे. त्यामध्ये सॉफ्टवेअर अपडेटअभावी १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या लाभार्थ्यांना लसीकरण होणार नाही, असा मजकूर यामध्ये आहे. शिवाय नागपूर जिल्ह्यात पाच ठिकाणी उपरोक्त स्वरूपाचे लसीकरण सुरू असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. सूचनापत्रात लसीकरण होणार नाही, असे कळविण्यात आले असले तरी, लसीकरण कधी सुरू होणार हे अद्याप अनुत्तरीत आहे.