शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क सुरू करा :पालकमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:29 IST

धरमपेठ येथील ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क सुरू करा. मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा असाव्यात यासाठी निधीची व्यवस्था करता येईल. पण महापौर, सत्तापक्षनेते, नगरसेवक यांनी एकत्र बसून हा निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी महापालिकेला दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धरमपेठ येथील ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क सुरू करा. मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा असाव्यात यासाठी निधीची व्यवस्था करता येईल. पण महापौर, सत्तापक्षनेते, नगरसेवक यांनी एकत्र बसून हा निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी महापालिकेला दिले.चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क सुरू करण्याच्या बाजूचे काही नागरिक आहेत, तर काही नागरिकांचा सुरू करण्याला विरोध आहे. धरमपेठ झोनच्या जनसंवाद कार्यक्रमात हे स्पष्ट झाले होते. या पार्कच्या देखभालीची मुदत संपली असून नव्याने निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. पण ट्रॅफिक पार्कच्या शेजारी राहणाऱ्यांना वाहनाच्या पार्किंगचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी पार्क नको अशी भूमिका घेतली होती. मात्र आजच्या बैठकीत या भागाच्या नगरसेवकांनी पार्क पाहिजे असल्याचे मत नोंदविले आहे. या पार्क च्या देखभालीचे काम खासगी संस्थेला देण्याचेही पालकमंत्र्यांनी सुचविले.मौजा हजारी पहाड येथील अखिल विश्वभारती हाऊसिंग सोसायटी येथील रहिवाशांनी रस्ते गडर लाईन, सांडपाणी, विजेचे खांब या सुविधांची मागणी केली आहे. ले-आऊटची ही जागा नासुप्र व मनपाची नाही. ही जागा आदिवासींची आहे. या संदर्भात एक याचिका न्यायालयात दाखल आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी शहराच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण तपासावे व आदिवासींची जागा नसल्याचे निष्पन्न झाले तर नागरी सुविधांची व्यवस्था करता येईल. याबाबत येत्या १५ दिवसात अहवाल देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.याशिवाय सीपीडब्ल्यूडी वसाहत देखभाल, कुंभारटोली, वसंतराव नाईक वसाहत अमरावती मार्ग, फुटाळा मरियमनगर मालकी हक्काचे पट्टे, पाण्याच्या वाढीव बिलाबाबत ओसीडब्ल्यूने शिबिरे घेऊन प्रश्न सोडविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. नंदग्राम योजना, सार्वजनिक मैदानात होत असलेले अतिक्रमण, तिनखेडे ले-आऊट, भरतनगर येथील अतिक्रमण हटविण्याबाबत, झिंगाबाई टाकळी येथील एसआरए योजना, राज्य कामगार विमा रुग्णालय, अजनी रेल्वे कॉलनी समस्या आदींच्या विषयांवरही बैठक घेण्यात आली.समस्या १५ दिवसांत सोडवाबाजीप्रभूनगर नागरिक मंडळाने या भागातील कचरा उचलला जात नाही, मनपाचे अधिकारी कारवाई करत नसल्याचे सांगितले. तसेच डुकरांचा त्रास असल्याचे सांगण्यात आले. येत्या १५ दिवसांत साफसफाई व कचऱ्याची समस्या सोडविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.दक्षता पथकामार्फत चौकशीपांढराबोडी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठ़ी शासनाने चार कोटी रुपये दिले होते. पण कामे झाली नाहीत. हा निधी कुठे गेले याचा पत्ता नाही. पालकमंत्र्यांनी या चार कोटींची दक्षता पथकामार्फत चौकशी करून क्वॉलिटी कंट्रोलकडे हे प्रकरण देण्याच्या सूचना दिल्या. तसेच चार कोटींच्या खर्चाची चौकशी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे देण्याचेही त्यांनी सूचित केले. बाजीप्रभूनगरच्या समस्या १५ दिवसांत सुटल्या नाही तर वेतनवाढीवर परिणाम होईल. असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.जनमंचने उपस्थित केला कॅमेऱ्यांचा मुद्दाजनमंच या संस्थेने कचराघराच्या जागेचे सौंदर्यीकरण आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची समस्या उपस्थित केली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २४ कॅमेरे लावण्यात आले. याशिवाय हिलटॉप या भागात आणखी कॅमेरे लावण्याची मागणी करण्यात आली. नैवेद्यम सभागृहावर एक कोटी रुपये मालमत्ता थकीत असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला. या सर्व समस्या १५ दिवसांत सोडविण्याचे निर्देश देण्यात आले.

 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका