शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसात मेयोची बंद 'ओटी' सुरू करा : संचालक लहाने यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:38 IST

मेयोचे सर्जिकल कॉम्प्लेक्समधील चार विभागाच्या शस्त्रक्रियागृहांना दोन वर्षातच ‘फंगस’ लागतेच कसे, असा जाब विचारीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्यराव लहाने यांनी चांगलेच धारेवर धरले. येत्या १५ दिवसात बंद शस्त्रक्रियागृह सुरू करा, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेयोचे सर्जिकल कॉम्प्लेक्समधील चार विभागाच्या शस्त्रक्रियागृहांना दोन वर्षातच ‘फंगस’ लागतेच कसे, आणि दोन महिने होऊनही समस्या निकाली का निघत नाही, असा जाब विचारीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्यराव लहाने यांनी चांगलेच धारेवर धरले. येत्या १५ दिवसात बंद शस्त्रक्रियागृह सुरू करा, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दोन वर्षापूर्वी सुरू झालेल्या सर्जिकल कॉम्प्लेक्समधील अस्थिव्यंगोपचार विभाग, कान, नाक व घसा विभाग, नेत्ररोग विभाग व आता शल्यचिकित्सा (सर्जरी) विभागाच्या शस्त्रक्रियागृहाला (ओटी) बुरशी (फंगस) लागल्याने सर्व ‘ओटी’ बंद पडल्या आहेत. या विभागांनी तात्पुरती आपली सोय केली आहे. नेत्ररोगाच्या रुग्णांची शस्त्रक्रिया डागा रुग्णालयात केली जात आहे. परंतु या सर्व सोईंना मर्यादा पडत आहे. परिणामी, शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्याच्या स्थितीत ५०० वर रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहे. ‘लोकमत’ने ६ ऑगस्ट रोजी ‘मेयोच्या शस्त्रक्रियागृहाला लागले फंगस’, १८ ऑगस्ट रोजी ‘महिना होऊनही शस्त्रक्रियागृह बंदच’ तर २ नोव्हेंबर रोजी ‘शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत ५००वर रुग्ण’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले. अखेर याची दखल वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. लहाने यांनी घेतली. १२ सप्टेंबर रोजी त्यांनी सायंकाळी ४ वाजता मेयोला भेट दिली. सूत्रानुसार, डॉ. लहाने यांनी आल्याआल्या बंद असलेल्या शस्त्रक्रियागृहांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे अधिकाऱ्यांचा ‘वर्ग’ घेतला. ‘एअर हॅण्डलिंग युनिट’ लावण्याचा चुकीचा निर्णय घेतलाच कसा, असा प्रश्न विचारीत, याला संपूर्णपणे बांधकाम विभागाचा विद्युत विभाग जबाबदार आहे. १५ दिवसात बंद शस्त्रक्रियागृह सुरू न झाल्यास ही तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांच्यासोबत मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर, उपअधीक्षक डॉ. रवी चव्हाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आग लागलेल्या ‘एनआयसीयू’ची केली पाहणीशॉर्ट सक्रिटमुळे आग लागल्याने सात नवजात बालकांचा जीव धोक्यात आलेल्या बालरोग विभागाच्या ‘एनआयसीयू’ची (न्युओनॅटल केअर युनिट) पहाणी डॉ. लहाने यांनी केली. त्यांनी ‘एनआयसीयू’ व ‘पीआयसीयू’ दहा-दहा खाटांचे करण्याच्या सूचनाही संबंधित विभाग प्रमुखांना व अधिष्ठात्यांना दिल्या. या घटनेला घेऊनही विद्युत विभागाला जाब विचारला.वाढीव शिक्षकांचा प्रस्ताव पाठवाडॉ. लहाने यांनी यावेळी सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा केली. त्यांंना येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या. मेयोच्या एमबीबीएसच्या जागा १५० वरुन २०० झाल्याने त्या तुलनेत शिक्षकांची पदे कमी पडत असल्याचे चर्चेतून समोर आले. त्यांनी वाढीव पदांचा प्रस्ताव २० ऑक्टोबरपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवा, अशा सूचना केल्या.२५० खाटा वाढणारसर्जिकल कॉम्प्लेक्स हे चार मजल्यांचे आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता आणखी २५० खाटांची गरज आहे, असे सांगून कॉम्प्लेक्सचे आणखी दोन मजले वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करा, आणि तो मंजूर करून घ्या, अशा सूचनाही डॉ. लहाने यांनी अधिष्ठाता डॉ. केवलिया यांना दिल्या. यावेळी त्यांनी ‘अ‍ॅडमिनीस्ट्रेशन बिल्डींग’च्या बांधकामाची पाहणी केली.परिचारिकेकडून रुग्णाला अयोग्य वागणूकएका परिचारिकेकडून रुग्णाला अयोग्य वागणूक मिळाल्याने मेयोच्या अपघात विभागात वाद निर्माण झाला. अखेर सुरक्षा रक्षकांना यात हस्तक्षेप करावा लागला. एका सामाजिक कार्यकर्त्यासोबत झालेल्या या प्रकरणाची तक्रार ते वरिष्ठांना करणार असल्याचे सांगितले जात आहे.प्राप्त माहितीनुसार, गुरुवार रात्री मेयोच्या अपघात विभागात रुग्णांची नोंद करणाऱ्या एका परिचारिकाच्या पुढे पाच-सहा रुग्ण रांगेत लागले होते. या रांगेत काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष इरसाद अली हे वृद्ध महिला मोहिनीदेवी टांक यांना घेऊन उभे होते. परंतु ती परिचारिका रुग्णांशी नीट संवाद साधत नव्हती. इरसाद अली यांच्याशीही त्यांनी मोठ्या आवाजाने संवाद साधला. त्यांनी आवाजाला घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र वाद वाढला. परिचारिकाने सुरक्षा रक्षकांना बोलविल्याने पुढे हे प्रकरण शांत झाले. परंतु वेदना सहन करणाऱ्या रुग्णांशी परिचारिकेने दोन शब्द प्रेमाने बोलले तर तेवढाच त्यांना धीर मिळतो. मात्र हा प्रकार संताप व्यक्त करणारा असल्याचे इरसाद अली यांनी सांगितले. या प्रकारणाची तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले. प्रकरणासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)