शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना निदानासाठी नवीन पाच ठिकाणी प्रयोगशाळा सुरू करा  : हायकोर्टाचा सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 21:02 IST

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना निदानाकरिता नागपुरातील मेडिकलसह अकोला, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दोन आठवड्यात व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक लेबॉरेटरी (व्हीआरडीएल) सुरू करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देनागपूर मेडिकल, अकोला, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूरचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना निदानाकरिता नागपुरातील मेडिकलसह अकोला, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दोन आठवड्यात व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक लेबॉरेटरी (व्हीआरडीएल) सुरू करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दिला.यासंदर्भात उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका प्रलंबित असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने रेकॉर्डवरील माहिती लक्षात घेता विविध महत्त्वपूर्ण आदेश दिले. विदर्भामध्ये केवळ नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातच ‘व्हीआरडीएल’ आहे. या लेबॉरेटरीवर संपूर्ण विदर्भासह तेलंगणा, छत्तीसगड व मध्य प्रदेशातील रुग्णांचा भार आहे. त्यामुळे वरील ठिकाणी तातडीने ‘व्हीआरडीएल’ कार्यान्वित करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच कोरोना निदानाकरिता निकषानुसार सुविधा असलेल्या खासगी प्रयोगशाळांनाही रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी मान्यता व नोंदणी देण्यावर एक आठवड्यात निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश केंद्र व राज्य सरकारला दिले. नागपुरात डॉ. शैलेश मुंधडा यांच्या प्रयोगशाळेत कोरोना निदानाची सुविधा आहे. परंतु केंद्र व राज्य सरकारने या प्रयोगशाळेला कोरोना निदानाची मान्यता दिली नाही. खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणीचा खर्च सुमारे नऊ हजार रुपये आहे. परंतु हा खर्च करण्यास तयार असलेल्या रुग्णांना खासगी प्रयोगशाळेत पाठविता येऊ शकते. त्यामुळे सरकारी प्रयोगशाळेवरील भार कमी होईल. तसेच सरकारने कर सवलत व अनुदान दिल्यास चाचणीचा खर्चही नियंत्रणात ठेवता येईल, असे न्यायालयाला सदर निर्देशापूर्वी सांगण्यात आले. न्यायालयात वरिष्ठ वकील जुगलकिशोर गिल्डा, अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, अ‍ॅड. अनुप गिल्डा, अ‍ॅड. राम हेडा, अ‍ॅड. सुधीर पुराणिक आदींनी युक्तिवाद केला.--------कारागृहात स्वतंत्र वॉर्ड, विमान प्रवाशांची तपासणीमध्यवर्ती कारागृहात कोरोनाग्रस्त बंदिवानांसाठी स्वतंत्र वॉर्ड नाही. तसेच नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांचा ताप तपासला जात नाही, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने संपूर्ण विदर्भातील मध्यवर्ती कारागृहांमध्ये कोरोनाग्रस्त बंदिवानांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात यावेत आणि परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत प्रत्येक विमान प्रवाशाचा ताप मोजण्यात यावा, असे आदेश राज्य सरकारला दिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या