शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ६३७ खासगी रुग्णालयात कोविड उपचार सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 00:04 IST

वाढत्या रुग्णसंख्येमुळे खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याने गरजू रुग्णांना उपचारासाठी भटकंती करावी लागते. ही परिस्थिती लक्षात घेता शहरातील नोंदणीकृत सर्व खासगी रुग्णालयांना कोविड उपचार सुरू करण्यासंदर्भात नोटीस बजावण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय रुग्णालया पाठोपाठ शहारातील ६१ खासगी रुग्णालयांना कोविड उपचाराची परवानगी दिली आहे. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याने गरजू रुग्णांना उपचारासाठी भटकंती करावी लागते. ही परिस्थिती लक्षात घेता शहरातील नोंदणीकृत सर्व खासगी रुग्णालयांना कोविड उपचार सुरू करण्यासंदर्भात नोटीस बजावण्याचे निर्देश महापौरसंदीप जोशी यांनी दिले.मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात मंगळवारी खासगी रुग्णालयासंदर्भात विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चिलकर, टाटा ट्रस्टचे टिकेश बिसेन, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ.अर्चना कोठारी, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.प्रमोद गिरी आदी उपस्थित होते.शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ४५ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे शहरात कोविड रुग्णांसाठी बेड्स वाढविणे अत्यावश्यक आहे. शहरात ६३७ नोंदणीकृत खासगी रुग्णालये आहेत. या प्रत्येक रुग्णालयात किमान पाच बेड कोविडसाठी दिल्यास मोठी सुविधा होईल. जे कोविड बेड्स देण्यास असमर्थ आहेत, त्यांनी मनपाला त्यांच्याकडील वैद्यकीय मनुष्यबळ पुरवावे.मनपाकडे २०० बेड्स तयार आहेत, मात्र वैद्यकीय मनुष्यबळाअभावी तिथे सेवा देणे शक्य नाही. खासगी रुग्णालयांनी कर्तव्य भावनेतून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कोविड बेड्स उपलब्ध करावे. ते शक्य नसल्यास वैद्यकीय मनुष्यबळाचे सहकार्य केल्यास मनपासह मेयो, मेडिकल व मनपा रुग्णालयातील आणखी ४०० बेड्स नागरिकांसाठी उपलब्ध होऊ शकतील. नोटीसकडे दुर्लक्ष करून कोणतीही कार्यवाही न केल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही संदीप जोशी यांनी दिला.बिल तपासणीसाठी 'प्री ऑडिट कमिटी'कोविड पॉझिटिव्ह रुग्णांकडून खासगी रुग्णालयांमार्फत लाखो रुपये बिल वसूल करण्यात येत असल्याच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी राज्य शासनाने दखल घेतली आहे. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणाऱ्या बिलाची तपासणी करण्यासाठी राज्य शासनाने 'प्री ऑडिट कमिटी' गठित केली आहे. राज्य मुख्य सचिवांद्वारे मिळालेल्या पत्रानुसार मनपामध्येही समिती गठित करण्यात आल्याची माहिती जलज शर्मा यांनी दिली. शहरातील खासगी रुग्णालयांमधून सुटी होणाऱ्या रुग्णांची अंतिम बिले मागवून तपासली जाणार आहेत. मनपाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा अधिक बिल काढणाऱ्या रुग्णालयांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीMayorमहापौरhospitalहॉस्पिटल