शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

स्टार बसचे ‘अच्छे दिन आ गये’

By admin | Updated: May 30, 2014 01:06 IST

सध्या सगळीकडेच ‘अच्छे दिन आ गये’चा नारा दिला जात आहे. हानारा आता जनतेसाठी चांगले दिवस येतील या अर्थाने असला तरी नागपूरकरांसाठी मात्र नेमके याऊलट झाले आहे. सेवेच्या नावावर बोंब

प्रवाशांवर भुर्दंड : तिकिटात एक ते दोन रुपयांची वाढ नागपूर : सध्या सगळीकडेच ‘अच्छे दिन आ गये’चा नारा दिला जात आहे. हानारा आता  जनतेसाठी चांगले दिवस येतील या अर्थाने असला तरी नागपूरकरांसाठी मात्र नेमके याऊलट झाले  आहे. सेवेच्या नावावर बोंब असलेल्या स्टार बसचे भांडे  वाढविण्यात आले आहे. त्यामुळे आता  स्टार बसचे चांगले दिवस येणार असून प्रवाशांवर मात्र भूर्दंड बसणार आहे.  स्टार बसने केलेल्या भाडेवाढीला प्रादेशिक परिवहन प्राधिकरण आणि प्रादेशिक परिवहन  अधिकार्‍यांनी मंजुरी प्रदान केली आहे. प्रवासाचा टप्पा जितका लांब त्याप्रमाणे भाड्यात एक व  दोन रुपयाची वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर १ जूनपासून लागू होतील. यात ४ ते १६  कि.मी.च्या प्रवासात एक रुपयाची वाढ तर १६ ते २0 किलोमीटरच्या प्रवासाठी दोन रुपयांची वाढ  करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची सभा नुकतीच जिल्हाधिकारी  कार्यालयात अभिषेक कृष्णा यांच्यासह आयोजित करण्यात आली. या बैठकीत दर वृद्धीला मंजुरी  देण्यात आली आहे. स्टार बस संचालक वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लि. (व्हीएनआयएल) आणि मनपा प्रशासन यांच्यात  करार झाला होता. या अंतर्गत एसटीच्या भाडे वाढीसह स्टार बसच्या किरायातही वाढ करण्याची  अट ठेवण्यात आली. मागील महिन्यात एसटीच्या किरायात वृद्धी करण्यात आली. त्यानंतर स्टार  बसकडूनही किरायात वृद्धी करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. स्टार बसच्या स्थितीत  मागील एक वर्षात कुठलीही सुधारणा झाली नाही. रस्त्यांवर धावणार्‍या बसेसची संख्याही  सातत्याने कमी होत आहे. पण किरायात वृद्धी करण्याच्या प्रस्तावाला मात्र मनपा प्रशासनाने मंजुरी  दिली आहे.  किरायात मात्र एक रुपयाची वृद्धी करण्यात आली आहे. जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत केंद्राकडून  मिळालेल्या २६0 बसेसची स्थिती विचारण्यात आली. त्यावेळी संबंधित माहिती नंतर देण्यात  येईल, असे सांगण्यात आले होते, असे आयुक्त श्याम वर्धने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)