शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक शुल्क सवलत आता ३१ मार्चपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:07 IST

नागपूर : राज्यात कोरोनामुळे मालमत्ता खरेदीसंदर्भातील मुद्राक शुल्कांमध्ये राज्य शासनाने दोन टक्के दराने सवलत दिली होती. आता १ जानेवारी ...

नागपूर : राज्यात कोरोनामुळे मालमत्ता खरेदीसंदर्भातील मुद्राक शुल्कांमध्ये राज्य शासनाने दोन टक्के दराने सवलत दिली होती. आता १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ दरम्यान नोंदणी शुल्कामध्ये १.५ टक्के या दराने सवलत देण्यात आली आहे. यासंबंधीचे निर्देश सह जिल्हा निबंधक अशोक उघडे यांनी जारी केले.

कोरोना लॉकडाऊनमुळे बांधकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यातील बिल्डर आणि विविध संघटनांच्या मागणीनंतर राज्य शासनाने या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रांक शुल्कात सवलतीची घोषणा केली आणि १ सप्टेंबरपासून अंमलबजावणीही केली. त्यानंतर घरखरेदी आणि रजिस्ट्रीचा वेगही वाढला. त्यामुळे बांधकाम क्षेत्राने नव्याने झेप घेतली असून पूर्वीच्या तुलनेत घरखरेदी ३० टक्क्यांपेक्षा जास्तने वाढली आहे. शासनाने ३ टक्के मुद्रांक शुल्क सवलतीची ३१ डिसेंबरपर्यंत असलेली मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवावी, अशी मागणी बांधकाम क्षेत्रातून होत होती. लोकमतने वृत्त प्रकाशित करीत या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले. याची शेवटी शासनाने दखल घेतली.

महसूल व वन विभागाच्या अधिसूचनेनुसार कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्री करारपत्राच्या दस्तऐवजावर या अधिनियमान्वये आकारणी योग्य असलेल्या मुद्रांक शुल्कावर ही सवलत देण्यात येत आहे. मुद्रांक शुल्क भरल्यानंतर असे मुद्रांकित दस्तनोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार दस्त निष्पादनापासून चार महिन्यापर्यंत नोंदणी करता येईल. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्क लावून निष्पादित केलेल्या दस्तऐवजांना पुढील चार महिने मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ मिळणार आहे.