शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ठप्प पडलेला विदर्भातील पर्यटन व्यवसाय दीड वर्षानंतर टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनलॉक प्रक्रियेनंतर राज्य सरकार निर्बंध शिथिल करीत असल्याने मागील दीड वर्षापासून ठप्प पडलेल्या विदर्भातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनलॉक प्रक्रियेनंतर राज्य सरकार निर्बंध शिथिल करीत असल्याने मागील दीड वर्षापासून ठप्प पडलेल्या विदर्भातील पर्यटन व्यवसायाला पुन्हा जुने दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने सरकारने या संदर्भात घोषणा करून या व्यवसायाला पुन्हा उभारी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

विदर्भातील पर्यटनाला नागपूरसह परिसरातील क्षेत्रात मोठा वाव आहे. या व्यवसायातून रोजगाराची संधी असली तरी कोरोना संक्रमणामुळे मागील दीड वर्षापासून हा व्यवसायच संकटात पडला होता. विदर्भातील पर्यटनाचे मुख्य स्त्रोत वनपर्यटन आहे. अलीकडे निसर्ग पर्यटनावरही पर्यटन संचालनालयाकडून भर दिला जात असला तरी अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा विदर्भातील पर्यटनाचा व्यवसाय आजतरी वनपर्यटनावरच अवलंबून आहे.

वाघ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. राज्यात सर्वाधिक वाघ ताडोबाच्या जंगलात असल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या देशी आणि विदेशी पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. या सोबतच पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प तसेच पवनी-उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यामुळे रिसॉर्ट व्यवसायाला वाव मिळाला. ३५० च्या जवळपास वनपर्यटनावर अवलंबून असलेले रिसॉर्ट्स विदर्भात आहेत. वनव्याप्त गावातील तरुणांना जीप्सीचा रोजगार मिळाला. सुमारे ६५० जीप्सी व्यावसायिक आणि तेवढ्याच संख्येतील गाईड्स वन पर्यटनावर अवलंबून आहेत. मात्र दीड वर्षापासून वनपर्यटन बंद असल्याने या बेरोजगार तरुणांवर उपासमारीचे संकट होते. १ ऑक्टोबरपासून वनपर्यटन सुरू होत असल्याने ते आता दूर होईल, अशी अपेक्षा आहे.

...

नागपूरच्या पर्यटनाला विविधांगी आयाम

वनपर्यटन, इको टुरिझम, हेरिटेज, मंदिरे असा विविधांगी आयाम नागपूरच्या पर्यटनाला आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीला वर्षभरात भेट देणाऱ्यांची संख्या लाखांवर असते. मात्र मागील दीड वर्षात कोरोना संक्रमणामुळे पर्यटकांना प्रतिबंध आहे. वनपर्यटनाला येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. नागपूरलगत असलेले पेंच, उमरेड व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य, तसेच नव्याने सुरू झालेले स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय हे पर्यटकांचे आकर्षण आहे.

...

पर्यटन विकासासाठी अपेक्षा

- पर्यटन व्यवसायाच्या बळकटीसाठी सरकारने घोषणा करावी.

- स्थानिक खासगी उद्योजकांनी पुढे यावे. शासनाने त्यांना सहकार्य आणि प्रोत्साहन द्यावे.

- राजकीय इच्छाशक्ती दिसावी. पर्यटनवाढीच्या दृष्टीने नागपूर शहर मध्यवर्ती मानून योजना आखाव्यात.

- पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या खासगी व्यक्ती आणि संस्थांना शासनाने पाठबळ द्यावे.

- विदर्भातील पर्यटन विकासासाठी धोरण आखून वाव मिळवून द्यावा.

...

कोट

किल्ले, ऐतिहासिक इमारती, जंगल, संरक्षित जंगल, अभयारण्य, मंदिरांची संख्या आपल्याकडे अधिक प्रमाणावर आहे. उत्सुकतेपोटी आणि अभ्यासापोटी भेट देणाऱ्याची संख्या अधिक आहे. हे पर्यटन व्यावसायिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हावे. पर्यटन विकासाच्या शासनस्तरावर होणाऱ्या घोषणांच्या तुलनेत प्रयत्नदेखील भरीव व्हावेत.

- चंद्रपाल चौकसे, पर्यटन अभ्यासक, नागपूर

...