शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सडकछाप मजनूच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेने घेतले विष

By admin | Updated: June 27, 2017 01:37 IST

गेल्या आठ महिन्यांपासून मानसिक त्रास देणाऱ्या सडकछाप मजनूच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षिकेने (वय ३३) विष प्राशन केले.

आठ महिन्यांपासून त्रास : पाठलाग, मेसेज करून केले त्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या आठ महिन्यांपासून मानसिक त्रास देणाऱ्या सडकछाप मजनूच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षिकेने (वय ३३) विष प्राशन केले. तिची प्रकृती गंभीर असून, या घटनेमुळे सक्करदरा परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित महिलेच्या पतीकडून तक्रार दाखल होताच पोलिसांनी याप्रकरणी सौरभ प्रकाश ढोले (वय २६) याला अटक केली आहे. पीडित शिक्षिका आणि आरोपी ढोले एकमेकांशेजारी राहतात. पीडितेचा पती खासगी नोकरी करतो. शेजारी म्हणून सहज बोलचाल करणाऱ्या शिक्षिकेचा गेल्या आठ महिन्यांपासून आरोपी सौरभने पिच्छा पुरविणे सुरू केले आहे. तिचा पाठलाग करणे, सलगी साधण्याचा प्रयत्न करणे, हातवारे करणे, मोबाईलवर वारंवार मेसेज करणे, असे प्रकार सुरू झाल्यामुळे शिक्षिका त्रस्त झाली. तिने हा प्रकार पतीला सांगितल्यानंतर सौरभला शिक्षिकेच्या पतीने एकदा समजावूनही सांगितले. मात्र तो ऐकला नाही. बदनामी होईल, या धाकाने दाम्पत्य गप्प बसल्यामुळे आरोपी निर्ढावला.त्याचा त्रास दिवसागणिक वाढतच चालल्यामुळे प्रचंड दडपणात आलेल्या शिक्षिकेने रविवारी दुपारी विष घेतले. तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सौरभच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पीडित महिलेच्या पतीने (वय ४३) सक्करदरा ठाण्यात नोंदविली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक डेहनकर यांनी आरोपी सौरभ प्रकाश ढोले याच्याविरुद्ध कलम ३५४ (ड) अन्वये गुन्हा नोंदविला. महिलेची मृत्यूशी झुंजया प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विष घेणाऱ्या शिक्षिकेची प्रकृती गंभीर असून, सक्करदऱ्यातील एका खासगी रुग्णालयात तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. डॉक्टरांकडून परवानगी मिळाली नसल्यामुळे पोलिसांना तिचे बयानही नोंदविता आले नाही. आरोपी सौरभ रिकामटेकडा असून, त्याला अटक करण्यात आली आहे.