शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: June 25, 2016 03:02 IST

चालकाने बसच्या मागे असलेल्या कारला साईड दिली नाही म्हणून कारमधील चौघांनी बसचालकास शिवीगाळ करीत मारहाण केली. एवढेच नव्हे तर बसची तोडफोड केली.

बसचालकास मारहाण प्रकरण : चौघांपैकी दोन आरोपी अटकेत, बसच्या काचा फोडल्याकाटोल : चालकाने बसच्या मागे असलेल्या कारला साईड दिली नाही म्हणून कारमधील चौघांनी बसचालकास शिवीगाळ करीत मारहाण केली. एवढेच नव्हे तर बसची तोडफोड केली. मारहाण करणाऱ्या चौघांपैकी दोघांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ काटोल आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ५ वाजता ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत काटोल आगारातून एकही बस बाहेर पडली नव्हती. यात वरुड, मोर्शी, परतवाडा येथून काटोलमार्गे नागपूरला जाणाऱ्या बसेसचाही समावेश होता. या आंदोलनाचा प्रवाशांना चांगलाच फटका बसला. सूरज तिवारी (२३) व अशोक मरकाम दोघेही रा. फेटरी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काटोल आगाराची एमएच-४०/वाय-५३७९ क्रमांकाची भंडारा-काटोल ही बस गुरुवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास नागपूर बसस्थानकाहून काटोलला येण्यासाठी निघाली. ही बस काटोल-नागपूर मार्गावरील नागपूर शहरालगतच्या टोल नाक्याजवळ पोहोचताच तिच्या मागे एक कार होती. रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास ही बस काटोल-नागपूर मार्गावरील कळमेश्वरनजीकचे रेल्वे फाटक बंद असल्याने फाटकाजवळ थांबली. त्यातच बसच्या मागे असलेल्या कारमधील चौघांनी बसचालक सतीश गावंडे यांना साईड का दिली नाही, अशी विचारणा करीत शिवीगाळ करायला सुरुवात केली. हा प्रकारच एवढ्यावर न थांबता, चौघांनी गावंडे यांना लोखंडी रॉडने मारहाण करून बसची तोडफोड केली. त्यात बसच्या काचा फोडल्या.हा प्रकार सुरू असताना वाहन व काही प्रवासी गावंडे यांच्या मदतीला धावले. त्यांनाही या चौघांनी धमकावले. दरम्यान, गावंडे यांनी जखमी अवस्थेत सदर बस कळमेश्वर बसस्थानकावर आणली. त्यांच्यावर कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना लगेच नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी भादंवि ३५३, ३४१, ३३३, १८६ अन्वये गुन्हा नोंदवून शुक्रवारी सकाळी सूरज व अशोकला अटक केली. उर्वरित दोन आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेच्या निषेधार्थ काटोल आगारातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ५ वाजतापासून ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. आरोपींवर कारवाई करून आंदोलनातील कर्मचारी व कामगारांवर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी रेटून धरली. त्यातच अधिकाऱ्यांनी कामगार नेत्यांची समजूत काढत आधी बसेस सुरू करण्याची सूचना केली. कारवाई करणार नसल्याचे आश्वासन देताच कामगारांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर सकाळी ११ वाजतापासून काटोल आगारातील सर्व बसेस बाहेर पडायला सुरुवात झाली. बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने ठाणेदार दिगंबर चव्हाण यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक राठोड यांनी बंदोबस्त ठेवला होता. (तालुका प्रतिनिधी)प्रवाशांचे हालया आंदोलनामुळे काटोल आगारातील सर्व बसेस तसेच वरुड, मोर्शी, परतवाडा, अमरावती, जळगाव (जामोद) आगाराच्या काटोलमार्गे नागपूरला जाणाऱ्या बसेस काटोल बसथानकात अडकून पडल्या होत्या. त्यामुळे बसस्थानकात सकाळी ११ वाजेपर्यंत एकूण ७२ बसेस उभ्या होत्या. यात चंद्रपूर, राजुरा, माहूर, भंडारा, तुमसर, वर्धा, नागपूर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेसचा सावेश होता. परिणामी, शेकडो प्रवासी अडकून पडल्याने त्यांचे हाल झाले. शिवाय, काटोल आगाराची एकही बस ग्रामीण भागात न गेल्याने गावांमधील प्रवाशांची गैरसोय झाली होती. या आंदोलनामुळे आगाराचे अंदाजे ४ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगार प्रमुख शीतल शिरसाठ यांनी दिली. अधिकाऱ्यांशी चर्चा काटोलचे आगार प्रमुख शीतल शिरसाठ यांनी या आंदोलाची तसेच घटनेची माहिती प्रादेशिक नियंत्रकांना दिली. त्यामुळे एसटीचे नागपूर येथील तांत्रिक यंत्र अधिकारी अमोल गाडबैल, वरिष्ठ आगार व्यवस्थापक एस. एस. हेडाऊ, विभागीय कामगार अधिकारी वाकोडीकर काटोल येथे पोहोचले. त्यांनी इंटक एस. टी. वर्कर्स संघटनेचे अरुण भागवत, शेषराव पावडे, आर. एस. भांगे, के. व्ही. सांगण, सतीश पुरी, श्रीकांत घाटोळे, अब्दुल नहीम, गणेश वानखेडे, गुड्डू पठाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व कामगारांशी चर्चा केली.