जीवितहानी टळली : वर्धा मार्गावर अपघातबुटीबोरी : भरधाव एसटी बस व हायड्रा क्रेनची जोरदार धडक बसली. ही घटना नागपूर-वर्धा महामार्गावरील बुटीबोरी नजीकच्या एसीसी चौकात शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. अपघाताच्या या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी बस व क्रेनचे काही प्रमाणात नुकसान झाले. बुटीबोरी परिसरातील नागपूर-वर्धा महामार्गावरील एसीसी चौकात यवतमाळकडून येणाऱ्या एमएच-०७/सी-७१३९ क्रमांकाच्या बसची एमआयडीसीकडे जाणाऱ्या एमएच-३१/सीव्ही-६८९४ क्रमांकाच्या हायड्रा क्रेनला जोरदार धडक बसली. या घटनेत दोन्ही वाहनांचे चालक व वाहक थोडक्यात बचावले. परंतु बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात प्रथमोपचार करून सुटी देण्यात आली. जबर धडकेमुळे दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. या घटनेत प्रथमदर्शनी मोठी जीवित हानी झाली असावी, असे चित्र होते. मात्र प्रसंगावधानाने प्राणहानी टळली. (प्रतिनिधी)
एसटी बस-क्रेनची धडक
By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST