शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

एसटी अन् रेल्वेने दिली परप्रांतीय मजुरांना साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST

मेट्रो रेल्वेने साकारले सहा स्टेशन : विमानतळावर कार्गो सेवा सुरू नागपूर : मार्च महिन्यात कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली. ...

मेट्रो रेल्वेने साकारले सहा स्टेशन : विमानतळावर कार्गो सेवा सुरू

नागपूर : मार्च महिन्यात कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली. विमानसेवा बंद होऊन मेट्रो रेल्वेचीही चाके थांबली. रेल्वेगाड्या तसेच एसटी बसेसची वाहतूकही बंद करण्यात आली. परंतु लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी मागणी केल्यामुळे श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. तर एसटीनेही परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पेलली. कोरोनात मेट्रो रेल्वे बंद असली तरी लॉकडाऊनच्या काळात मेट्रो रेल्वेने सहा रेल्वेस्थानकांचे काम पूर्ण केले. तर विमानतळावर लॉकडाऊनमध्ये कार्गो सेवा सुरू होती.

रेल्वेने दिला विकासकामांवर भर ()

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे महिन्याचे उत्पन्न सरासरी जवळपास ३०० कोटी रुपये होते. परंतु कोरोनामुळे रेल्वेच्या उत्पन्नाचा स्रोत बंद झाला. जवळपास सहा महिने रेल्वेची चाके थांबली होती. परंतु अनेक मजूर विविध ठिकाणी अडकून पडल्यामुळे त्यांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. उत्पन्न वाढविण्यासाठी रेल्वेने विशेष पार्सल रेल्वेगाड्या सुरू केल्या. कोरोनाच्या काळात रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे या काळात विभागातील विकासात्मक कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर रेल्वे बोर्डाने नियमावली जाहीर करून विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला. या गाड्यात कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली. मास्क घालणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आदींची सक्ती प्रवाशांना करण्यात आली. परंतु रेल्वेगाड्यांची संख्या कमी झाल्यामुळे कुलींना काम मिळणे कमी झाले. अशा स्थितीत त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हळूहळू रेल्वेगाड्यांची संख्या वाढत असल्यामुळे कुलींना दिलासा मिळत आहे. सध्याच्या स्थितीत नागपूरवरून ४५ जोडी म्हणजे ९० विशेष रेल्वेगाड्या धावत आहेत.

लॉकडाऊनमध्ये केली महत्त्वाची कामे

‘लॉकडाऊनमध्ये रेल्वे प्रशासनाने उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालविल्या. श्रमिक स्पेशलने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविले. याशिवाय विभागातील विकासकामे आटोपण्यावर भर देण्यात आला.’

-एस. जी. राव. जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

..........

मेट्रोने साकारला डबल डेकर पूल ()

शहरवासीयांना पूर्वी ऑरेंज लाईनवर खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनपर्यंत देण्यात येत असलेल्या मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार २०२० मध्ये करण्यात आला. नव्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात अ‍ॅक्वा लाईनवर लोकमान्यनगर ते सीताबर्डीपर्यंत नवीन मेट्रो सेवा सुरू करण्यात आली. परंतु त्यानंतर कोरोनामुळे ऑरेंज आणि अ‍ॅक्वालाईनवर प्रवासी वाहतूक बंद झाली. जवळपास आठ महिने मेट्रो सेवा ठप्प झाली होती. या काळात मेट्रो रेल्वेने मनीषनगरचा रेल्वे ओव्हरब्रीज आणि अंडरब्रीजचे काम पूर्ण केले. तर ऑरेंज लाईनवर अजनी चौक, रहाटे कॉलनी आणि अ‍ॅक्वा लाईनवरील शंकरनगर चौक, एलएडी चौक, रचना जंक्शन आणि बन्सीनगर येथील रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण केले. देशात जयपूरनंतर नागपुरात रिब आणि स्पाईन तंत्रज्ञानावर आधारित डबलडेकर पुलाचे काम २०२० मध्ये पुर्ण होऊन हा पूल नागरिकांच्या सुविधेसाठी खुला करण्यात आला. सध्या सीताबर्डी ते प्रजापतीनगर आणि सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान मेट्रोच्या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. कामठी मार्गावरही डबल डेकर पुलाचे काम वेग घेत आहे.

..........

विमानतळावर उतरले परदेशातील भारतीय

कोरोनाची लाट येण्यापुर्वी जानेवारी ते मार्च दरम्यान विमान प्रवाशांची संख्येत मोठी वाढ झाली होती. परंतु मार्च महिन्यात कोरोनामुळे विमान वाहतूक बंद झाली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर फक्त कार्गो फ्लाईटची वाहतूक सुरू होती. त्यानंतर भारत सरकारने वंदे मातरम अभियानांतर्गत परदेशातील भारतीयांना भारतात आणण्याची घोषणा केल्यानंतर या विशेष विमानाने परदेशी भारतीय नागरिक नागपूर विमानतळावर उतरले. कोरोनात विमानसेवा बंद असताना विमानतळ प्रशासनाने विमानसेवा सुरू झाल्यानंतर कोणती काळजी घ्यायची यावर लक्ष केंद्रित केले. विमानतळावर चेअर मार्किंग, कॉन्टॅक्ट लेस नळ सुरू करण्यात आले. सॅनिटायझरची सुविधा तसेच इतर काळजी कशी घ्यावी याचे नियोजन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उत्पन्न एका आठवड्याला ३० लाख रुपये होते. कोरोनामुळे विमान वाहतूक बंद असल्यामुळे विमानतळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले. २०२० या वर्षात विमानतळाचे खासगीकरण करण्यासाठी कंसलटन्टची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कन्सलटंटची नियुक्ती झाल्यानंतर खासगीकरणासाठी निविदा काढण्यात येणार आहे. खासगीकरण झाल्यानंतर विमानतळावर प्रवाशांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. सध्या देशांतर्गत विमान वाहतूक सुरु असून आजमितीस नागपूर विमानतळावर २७ डोमॅस्टिक फ्लाईट येत आहेत. भविष्यात विमानवाहतुक आणखी वाढणार असल्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

विमानतळावर होणार सोयी-सुविधांचा विस्तार

‘डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या २७ विमानांची वाहतूक सुरु आहे. विमानतळाचे खासगीकरण करण्यासाठी कन्सलटंटची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर खासगीकरणासाठी निविदा काढण्यात येईल. विमानतळाचे खासगीकरण झाल्यानंतर प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.’

-आबीद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ

..............

एसटीने जोपासली सामाजिक बांधीलकी

‘एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने फेब्रुवारी महिन्यात पचमढी यात्रेत प्रवाशांना सुविधा दिली. त्यानंतर आंभोरा येथील यात्रेसाठी विशेष बस सोडण्यात आल्या. परंतु २२ मार्च पासून लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे एसटीची चाके ठप्प झाली. जुन महिन्यापर्यंत एसटी बसेसची वाहतुक बंद होती. परंतु या काळातही एसटीने आपली सामाजिक बांधीलकी जोपासून कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना १४ बसेसच्या माध्यमातून त्यांच्या घरी पोहोचविले. ९ ते ३० मे दरम्यान १७६२ फेºया चालवून ३५ हजार मजुरांना सुखरुप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडले. परंतु नियमित बसेसची वाहतुक बंद असल्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान झाले. कर्मचाºयांचे वेतन देण्यासाठीही एसटीकडे पैसे नव्हते. महाराष्ट्र शासनाने विविध सवलतींची थकलेली रक्कम दिल्यामुळे कर्मचाºयांच्या वेतनाचा तिढा सुटला. जुलै महिन्यात जिल्हांतर्गत वाहतुक सुरु झाली. परंतु नागपूर महापालिका रेड झोनमध्ये येत असल्यामुळे नागपूरला ग्रामीण भागातून बसेस येणे बंद होते. सुरुवातीला २२ प्रवाशांना एका बसमध्ये बसविण्याची परवानगी होती. परंतु सप्टेंबर महिन्यात पुर्ण क्षमतेने बसेसची वाहतुक सुरु झाली. सध्या एसटीची ७५ टक्के वाहतुक सुरु आहे. प्रवासी वाहतुक सुरु झाली असली तरी अद्याप अति दुर्गम भागातील फेºया आणि शैक्षणिक फेºया बंद आहेत. हळुहळु एसटीच्या फेºया पुर्ववत करण्याचे महामंडळाचे प्रयत्न सुरु असून लवकरच एसटी आपल्या पुर्वपदावर येण्याची अपेक्षा आहे.

कठीण प्रसंगासाठी एसटी सज्ज

‘कोटा येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरी सुखरुप पोहोचवून एसटीने ३५ हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडले. कठीण प्रसंगासाठी आजपर्यंत एसटीने आपली भूमिका बजावली आहे. भविष्यातही एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज आहे.’

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

-दयानंद पाईकराव

............