शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

९३३३ नागरिकांची पोलिसांकडून ऑन दी स्पॉट अँटिजेन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 23:09 IST

On-the-spot antigen test दुसऱ्या लाटेत हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतरही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. पोलीस प्रशासनाने एका महिन्यात अशा विनाकारण फिरणाऱ्या ९,३३३ लोकांची ऑन दी स्पॉट अँटिजन चाचणी केली आहे. तर २३३ पॉझिटिव्ह नागरिकांची १४ दिवसांसाठी क्वारंटाइन सेंटरला रवानगी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२३३ पॉझिटिव्ह नागरिकांची क्वारंटाइन सेंटरला रवानगी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दुसऱ्या लाटेत हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतरही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. पोलीस प्रशासनाने एका महिन्यात अशा विनाकारण फिरणाऱ्या ९,३३३ लोकांची ऑन दी स्पॉट अँटिजन चाचणी केली आहे. तर २३३ पॉझिटिव्ह नागरिकांची १४ दिवसांसाठी क्वारंटाइन सेंटरला रवानगी करण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी राज्य शासनाने ३१ मेपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. गरज नसेल तर घराबाहेर पडूच नये, असे वारंवार सांगितले आहे. पॉझिटिव्ह असतानाही रस्त्यावर फिरणाऱ्या 'सुपर स्प्रेडर'मुळे कोरोना जीवघेण्या अवस्थेत जिल्ह्यांमध्ये वाढला आहे. मात्र तरीही नागरिक बाहेर पडत असून त्यांच्याविरुद्ध पोलीस प्रशासनाला कारवाई करावी लागत आहे.

पोलिस विभागामार्फत १७ एप्रिल ते १८ मे या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विनाकारण बाहेर फिरणाऱ्या ९३३३ लोकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. ब्रेक द चेन नियमावली अंतर्गत अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणाऱ्या लोकांची ऑन द स्पॉट अँटिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये २३३ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे.

तिसरी लाट पुन्हा येण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे, लसीकरणासाठी आग्रही असावे, नागरिकांनी वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर व मास्क या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Policeनागपूर पोलीस