शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलाची जमीन अडथळामुक्त

By admin | Updated: January 21, 2016 02:51 IST

मानकापूर येथील यूएलसी जमीन विभागीय क्रीडा संकुलासाठी देण्यात आली आहे.

हायकोर्ट : यूएलसी जमीन वाटप घोटाळानागपूर : मानकापूर येथील यूएलसी जमीन विभागीय क्रीडा संकुलासाठी देण्यात आली आहे. या जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर स्टेडियम उभे झाले आहे. याशिवाय येथे विविध क्रीडाविषयक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. ही जमीन बट्टा आयोगाच्या चौकशीखालून गेली असून शासनाने या जमिनीचे वाटप कायम केले आहे. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही शासनाच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला. परिणामी क्रीडा संकुलाची जमीन अडथळामुक्त झाली आहे.यूएलसी जमीन वाटप घोटाळ्यासंदर्भात माजी आमदार सुनील शिंदे यांनी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व झेड. ए. हक यांच्या विशेष न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, बट्टा आयोगाने चौकशी केलेल्या ९९ पैकी ४ प्रकरणांवर याचिकाकर्ते व शासनाच्या वकिलाने युक्तिवाद केला. एकात्मिक झोपडपट्टी विकास प्रकल्पाकरिता देण्यात आलेल्या जमिनीवर सध्या किती नागरिक राहत आहेत, या जमिनीची सध्याची किंमत काय आहे इत्यादी माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने नासुप्र सभापती व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच विभागीय संशोधन केंद्राच्या जमिनीचा आराखडा तपासण्यास सांगितले. नारा येथील एक भूखंड नासुप्रला वाटप झाला नसल्यामुळे तो शासनाकडेच आहे, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. न्यायालयाने प्रकरणाच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. के. बट्टा यांचा आयोग स्थापन केला होता. आयोगाने चौकशी करून एकूण ९९ प्रकरणात यूएलसी भूखंडांच्या वाटपावर आक्षेप घेतला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)