शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सावनेर येथील रक्तदान शिबिराला उत्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:07 IST

सावनेर : ‘लोकमत’च्यावतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंती पर्वावर ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत राज्यभर ...

सावनेर : ‘लोकमत’च्यावतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंती पर्वावर ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याला साद देत शुक्रवारी सावनेर येथील रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला. यात महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

सावनेर येथील सुभाष मराठी प्राथमिक शाळेत ‘लोकमत’ व नगर परिषद, सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा रेखा मोवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अरविंद लोधी होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे पदाधिकारी रामराव मोवाडे, शिक्षण सभापती तुषार उमाटे, प्रशासन अधिकारी दिनेश बुधे, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक बाबा टेकाडे उपस्थित होते. शिबिरात सर्वप्रथम नगराध्यक्ष रेखा मोवडे यांनी रक्तदान केले. ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही मोहीम शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकात सेवाभाव निर्माण करणारी असल्याचे प्रतिपादन मोवाडे यांनी केले. उपाध्यक्ष लोधी यांनी लोकमतच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रक्तसंकलनाचे कार्य आयुष रक्तपेढीच्या चमूच्यावतीने करण्यात आले. रक्तदात्यांना याप्रसंगी भेटवस्तू व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शिबिराच्या आयोजनाप्रसंगी नगरसेवक सचिन उईके, स्वाती कामडी, विलास कामडी, सौरभ घटे, मोहन वानखेडे, सुजित बागडे, गजानन पटले, राजेंद्र सूर्यवंशी, रवींद्र ठाकूर, विजय लाड, नीरज बारापात्रे, कुणाल धपके, पिंटू सातपुते, तन्मय मोवाडे, अमित झोडापे आदी उपस्थित होते.