शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्मिक; यम नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 10:04 IST

विज्ञानाची जशी प्रगती होत गेली तसा माणूस आधुनिक व गतिमान होत गेला. त्यामुळे त्याची ऐहिक सुखाची लालसा वाढत गेली. तो शारीरिक कष्टापासून व अध्यात्मापासून दूर होत गेला.

प्रा. डॉ. संदीप ताटेवारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विज्ञानाची जशी प्रगती होत गेली तसा माणूस आधुनिक व गतिमान होत गेला. त्यामुळे त्याची ऐहिक सुखाची लालसा वाढत गेली. तो शारीरिक कष्टापासून व अध्यात्मापासून दूर होत गेला. त्याचा परिणाम म्हणजे शारिरीक व मानसिक दृष्ट्या तो कमजोर होत गेला. महर्षी पतंजली यांनी प्राचीन काळी योगसूत्र हा ग्रंथ लिहून त्यामध्ये योग सूत्र विशद केले. माणसाचे चित्त एकाग्र, स्थिर व निर्मळ असेल तर तो मानसिकदृष्ट्या सक्षम असतो. चित्त स्थिर राहण्यासाठी माणसाची वृत्ती कारणीभूत असते. महर्षी पतंजलि म्हणतात,तदा द्रष्टे: स्वरूपे अवस्थानम !योग साधनेमुळे साधकाची वृत्ती शांत होऊन चित्त निर्मळ होते. त्यांनी सांगितलेले अष्टांग योग मानवाला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी फार महत्वाचे आहे. ते म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी. यमाचे पाच प्रकार म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य व अपरिग्रह. जीवन जगत असतांना आपल्या बोलण्यात, वागण्यात, आचरणात अहिंसा असायला पाहिजे. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असे आपले वर्तन असायला पाहिजे. आपण नेहमी सत्याचा अंगिकार करायला पाहिजे. जेव्हा आपण खोटं बोलत असतो त्यामुळे आपला तणाव वाढतो. अस्तेय म्हणजे आपण लोभ टाळला पाहिजे. दुसऱ्याचे हिसकावून घेण्याच्या वृत्तीमुळे तणाव वाढत जातो. ब्रम्हचर्य म्हणजे ब्रम्हासारखे सत्विक आहार, विचार व आचरण . यामुळे तणाव कमी होतो. अपरिग्रह म्हणजे संग्रह करण्याची वृत्ती. जेव्हा पिढ्यानपिढ्या आपण संग्रह करतो तेव्हा हे माझ्यापासून सुटून जाणार तर नाही या भावनेमुळे तणाव वाढतो. नियमाचे पाच प्रकार सांगितले आहे. पाहिले शोच म्हणजे आंतरिक व बाह्य शुद्धी. आपण शारीरिक व मानसिक स्वच्छता ठेवायला पाहिजे. दुसरे संतोष म्हणजे समाधानी, आनंदी, हसत खेळत जीवन जगणे. तिसरे तप म्हणजे कामात सातत्य असणे व परिस्थितीला धैर्याने तोंड देणे. चौथे स्वाध्याय म्हणजे चांगले ज्ञान प्राप्त करणे व पाचवे ईश्वर प्रणिधान म्हणजे कुठेतरी निसर्ग शक्ती किंवा ईश्वर आहे यावर विश्वास ठेवून त्याला शरण जावून आपल्या कर्माचा भार ठेवून आयुष्य जगणे. यम नियमाचे पालन केल्यास आपले जीवन सुखमय व आनंदीमय होते. 

 

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक