शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आकड्यांची बनवाबनवी विजेचे खरे दर लपले

By admin | Updated: June 28, 2015 02:53 IST

१ जूनपासून लागू होत असलेल्या विजेच्या नव्या दरांकडे पाहून असे वाटते की, विजेच्या दरात काहीच वाढ झालेली नाही.

आकड्यांची बनवाबनवी विजेचे खरे दर लपले वीज महागणार : इंधन समायोजन शुल्काची पडणार भरकमल शर्मा ल्ल नागपूर१ जूनपासून लागू होत असलेल्या विजेच्या नव्या दरांकडे पाहून असे वाटते की, विजेच्या दरात काहीच वाढ झालेली नाही. परंतु प्रत्यक्षात तसे नसून हा आकड्यांचा लपंडाव आहे. आकड्यांची बनवाबनवी अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, खरी दरवाढ लक्षात येत नाही. आयोगाने आपल्या आदेशात नव्या दरांची तुलना एप्रिल १५ मध्ये लागू करण्यात आलेल्या दरांशी केली आहे. त्या हिशेबानुसार जी दरवाढ झाली ती जास्त आहे, असे कुणालाच वाटत नाही. परंतु एप्रिल १५ मध्ये इंधन समायोजन शुल्क समाविष्ट करण्यात आले होते. हे शुल्क नव्या दरात समाविष्ट नाही. आयोगाच्या आदेशात हे स्पष्ट लिहिण्यात आले आहे. त्यामुळे जेव्हा नव्या दरानुसार बिल तयार होईल तेव्हा इंधन समायोजन शुल्क त्यात जोडण्यात येईल. हे शुल्क जोडल्यामुळे बिलावर मोठा परिणाम पडतो. हे शुल्क विजेच्या खरेदीवर अवलंबून असते. महावितरणचा वीज खरेदी करण्याचा खर्च वाढल्यास हा खर्च वाढतो. त्यामुळे हे शुल्क स्थायी नसते. आयोगाने एप्रिल २०१५ पर्यंतचे दर दर्शवलेले असून त्यात हा दर लावण्यात आला आहे. ही रक्कम जोडण्यात आल्यामुळे काय परिणाम होईल, हे पाहण्यासाठी मागील तीन महिन्यांच्या दरांची माहिती असणे आवश्यक आहे. एप्रिलमध्ये घरगुती ग्राहकांनी वेगवेगळ्या श्रेणीसाठी हा दर प्रति युनिट ४९ पैशांपासून १.५० रुपये, मे महिन्यात ४९ पैशांपासून १.६० रुपये, जून महिन्यात २८ पैशांपासून १.०२ रुपये असे इंधन समायोजन शुल्क वसूल करण्यात आले आहे. ही रक्कम वीजदरात समाविष्ट होती. आता पुढील महिन्यापासून ही रक्कम वेगळी आकारण्यात येईल. महेंद्र जिचकार यांच्या मते, आयोगाच्या सुनावणीत याचा विरोध करण्यात आला.