शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांचा निधी खर्च करा

By admin | Updated: February 10, 2017 02:36 IST

शासकीय महाविद्यालये व रुग्णालयांना मंजूर झालेला जिल्हा नियोजन समितीचा निधी प्रशासकीय मान्यतेशिवाय

हायकोर्टाचे निर्देश : प्रशासकीय मान्यतेची गरज नाहीनागपूर : शासकीय महाविद्यालये व रुग्णालयांना मंजूर झालेला जिल्हा नियोजन समितीचा निधी प्रशासकीय मान्यतेशिवाय खर्च करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिलेत.संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २०१६-१७ आर्थिक वर्षात नागपुरातील मेयो व मेडिकलसह यवतमाळ व अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना प्रत्येकी ३ कोटी रुपये, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला ५ कोटी तर, दंत महाविद्यालयाला १.१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. परंतु, प्रशासकीय मान्यतेअभावी हा निधी अखर्चित आहे. येत्या मार्चपर्यंत निधी खर्च करणे आवश्यक आहे. अन्यथा निधी परत जाईल अशी माहिती न्यायालय मित्र अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने विषयाचे गांभिर्य लक्षात घेता हे निर्देश दिलेत.वित्त विभागाने गेल्या १७ जानेवारी रोजी जीआर जारी करून प्रशासकीय मान्यतेशिवाय ५० हजार रुपयांवर खरेदी करण्यास मनाई केली आहे. हा जीआर शासकीय रुग्णालयांचा निधी खर्च करण्यात कोणताही अडथळा निर्माण करणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला ४-डी ईको तर, मेयोमध्ये सीटी-स्कॅन मशीनची गरज आहे. संबंधित निधीतून या मशिनी खरेदी करता येऊ शकतात असे अ‍ॅड. गिल्डा यांनी न्यायालयाला सांगितले. २९ आॅक्टोबर २०१५ रोजी न्यायालयाने जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता नाही असा आदेश दिला होता. परंतु, या आदेशाचे पालन होत नाही याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने राज्य शासनाला यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. शासकीय रुग्णालयांच्या विकासासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे.(प्रतिनिधी)