शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाईन’च्या युगात ‘स्पीड पोस्ट’ वेगात

By admin | Updated: July 25, 2016 02:31 IST

तंत्रज्ञानाचा झालेला विकास व खासगी कंपन्यांचा शिरकाव यामुळे टपाल खात्याच्या ‘स्पीड पोस्ट’ प्रणालीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे

१४ महिन्यांत ५ कोटींची कमाई : टपाल खात्याच्या एकूण महसुलाचा आकडा ५७ कोटींहून अधिक नागपूर : तंत्रज्ञानाचा झालेला विकास व खासगी कंपन्यांचा शिरकाव यामुळे टपाल खात्याच्या ‘स्पीड पोस्ट’ प्रणालीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु प्रत्यक्षात ‘आॅनलाईन’च्या युगातदेखील ‘स्पीड पोस्ट’ची मागणी कायम आहे. नागपूर शहरात १४ महिन्यांच्या कालावधीत टपाल खात्याला ‘स्पीड पोस्ट’पासून पाच कोटींहून अधिक रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर शहरात टपाल खात्याला मिळत असलेल्या महसुलासंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. ‘स्पीड पोस्ट’पासून किती महसूल प्राप्त होतो, टपाल खात्याच्या विविध सेवा तसेच योजनांपासून किती निधी मिळतो, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘स्पीड पोस्ट’ हे ‘बीडी’ उत्पादनांतर्गत (बिझनेस डेव्हलपमेंट) येते. १ एप्रिल २०१५ ते ३१ मे २०१६ या १४ महिन्यांच्या कालावधीत टपाल खात्याला ‘स्पीड पोस्ट’पासून ५ कोटी ३० लाख ९ हजार ६८७ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. या कालावधीत नागपूर शहरात टपाल खात्याला एकूण ५७ कोटी ५० लाख ३५ हजार १५६ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. यात ‘बीडी’ उत्पादनांपासून ७ कोटी ३९ लाख ५८ हजार ६८४ रुपये तर ‘नॉन बीडी’ उत्पादनांपासून १० कोटी ७० लाख रुपये प्राप्त झाले. (प्रतिनिधी) टपाल आयुर्विम्यापासून सर्वाधिक महसूल टपाल खात्यातर्फे आयुर्विमादेखील काढण्यात येतो व याला ‘पीएलआय’ (पोस्टल लाईफ इन्शुरन्स) असे म्हणतात. १४ महिन्यांत नागपूर शहरात टपाल खात्याला सर्वाधिक महसूल ‘पीएलआय’पासून प्राप्त झाला आहे. प्राप्त झालेल्या महसुलाची आकडेवारी २३ कोटी ११ लाख इतकी आहे, तर ‘आरपीएलआय’पासून (रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स) ६० लाख रुपये प्राप्त झाले.