शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सदर उड्डाण पुलाची गती संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:26 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचए) नासुप्र ते पागलखाना चौक व छावणी पर्यंत उभारण्यात येणाºया उड्डाण पुलाचे काम संथगतीने सुरू आहे.

ठळक मुद्देवाहतुकीची होतेय कोंडी

बांधकामामुळे रस्ता अरुंदकमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचए) नासुप्र ते पागलखाना चौक व छावणी पर्यंत उभारण्यात येणाºया उड्डाण पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. शिवाय पुलाचे काम करीत असताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजण्यात आलेले नाही. बांधकामासाठी रस्त्याच्या मधोमध टीन शेड लावून दोन्ही बाजूने जागा राखीव करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे रस्ते अरुंद झालेले आहेत. बांधकामामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे दुचाकीस्वारांचे तोल जाऊन अपघात होत आहे. असे असतानाही ‘एनएचए’ ने संबंधित खड्डे भरण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून या दुर्लक्षामुळे प्रसंगी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नासुप्रच्या समोरून हा उड्डाणपूल सुरू होईल. सदर मुख्य रस्ता मार्गे राजभवनच्या समोरील चौकापर्यंत एकच पूल असेल. या पॉर्इंटपासून पुढे ‘वाय शेप’मध्ये दोन दिशेने दोन पूल जातील. एक पूल छिदवाडा रोडवर पागलखाना चौकाच्या पुढे उतरेल तर दुसरा पूल काटोल रोडवर छावणी माता मंदिराच्या समोर उतरेल. सहा महिन्यापूर्वी या पुलाच्या बांधकामासाठी मातीपरीक्षण करण्यात आले. चार महिन्यांपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. पागलखाना चौकापासून पुढे असलेल्या भागात काही पिलर उभारले गेले आहेत. मात्र, पागलखाना चौक ते छावणी चौकापर्यंत सुरू असलेल्या बांधकामामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. बांधकामामुळे दोन्ही बाजूला अरुंद रस्ता उरला आहे. शिवाय या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर पाणी साचलेले असते. यामुळे दुचाकी घसरण्याचा धोका आहे. यामुळे येथून सुलभतेने वाहने चालविण्यात अडचणी येत आहे. यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत आहे.शहरात मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. पिलर उभारले जात आहे. त्यासाठी रस्त्याच्या मधील जागा दोन्ही बाजूंनी टीन शेड लावून सुरक्षित करण्यात आली आहे. वाहने जाण्यासाठी उरलेल्या रस्त्यावर खड्डे पडले असतील तर आवश्यक तेथे डांबरीकरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी तर रस्त्याच्या बाजूचीही जागा समतल करण्यात आली आहे. रस्ता अरुंद झाल्यामुळे कुठेही वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात आहे. वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून चौकाचौकात सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे उभारण्यात येत असलेल्या नासुप्र व ते पागलखाना चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाच्या बांधकामात अशी कुठलीच खबरदारी घेण्यात आलेली नाही.