शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
3
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
4
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
5
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
6
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
7
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
8
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
9
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
12
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
13
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
14
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
15
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
16
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
17
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
18
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
19
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
20
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?

शिक्षणमंत्र्यांकडून संघप्रणीत शाळांना विशेष वागणूक

By admin | Updated: February 9, 2016 02:55 IST

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे सोमवारी संघभूमीत दौऱ्यावर आले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शाळांना त्यांच्याकडून विशेष वागणूक देण्यात आल्याचे दिसून आले.

संस्था प्रतिनिधींची घेतली वेगळी बैठक : प्रतिक्रिया देताना, ‘नरो वा कुंजरो वा’नागपूर : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे सोमवारी संघभूमीत दौऱ्यावर आले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शाळांना त्यांच्याकडून विशेष वागणूक देण्यात आल्याचे दिसून आले. त्यांनी संघप्रणीत शाळांची विशेष बैठक घेतली. आणि विशेष म्हणजे या बैठकीबाबत विचारणा केली असता स्पष्टवक्तेपणा बाजूला सारून त्यांनी चक्क ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेतली. तावडे यांनी केवळ संघाशी संबंधित शाळांची बैठक घेतल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.सोमवारी शिक्षणमंत्री तावडे विविध कार्यक्रमांसाठी नागपुरात आले होते. त्यांंच्या दौऱ्यात दुपारी १२ वाजता संघाशी संबंधित शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांशी संवादासाठी वेळ राखीव असल्याचे नमूद होते. त्यानुसार त्यांनी विविध शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यात शाळांच्या समस्या, पुढील दिशा, शासनाकडून अपेक्षा इत्यादी बाबी त्यांनी जाणून घेतल्या. परंतु यासंदर्भात ज्यावेळी तावडे यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा चक्क अशी बैठकच झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. ज्यावेळी त्यांना शासकीय दौऱ्याच्या पत्रकाबाबत सांगण्यात आले, तेव्हा कुठे त्यांनी अशी बैठक झाल्याचे मान्य केले.केवळ संघपरिवारातील शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींसोबतच चर्चा करण्याचे प्रयोजन का, याबाबत त्यांना विचारणा केली असता ते कुठलेही ठोस उत्तर देऊ शकले नाही. यापूर्वी अशाच प्रकारे अल्पसंख्यक शाळांची बैठक बोलविली असल्याचे उत्तर देत त्यांनी मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. एरवी तावडे हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखल्या जातात. अगदी विधिमंडळाच्या सभागृहातदेखील याचे अनेकदा दर्शन झाले आहे. अशास्थितीत संघभूमीत संघाशीच जुळलेल्या संस्थांची वेगळी बैठक घेण्याचे कारण का, याबाबत त्यांनी साधलेल्या मौनामुळे प्रश्नांमध्ये आणखी वाढच झाली आहे.(प्रतिनिधी)इतर शाळांचे काय?राज्याप्रमाणेच नागपूर विभागातील शाळांचेदेखील विविध प्रश्न व अडचणी आहेत. शासनासाठी सर्वच शाळा समान असणे अपेक्षित आहे. परंतु केवळ संघप्रणीत शाळांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून इतर शाळांकडे दुर्लक्ष करणे कितपत योग्य आहे; तसेच शिक्षण प्रणालीत बदलाचे वारे वाहत असताना पुरोगामी महाराष्ट्रात शाळांना विचारसरणीप्रमाणे महत्त्व मिळणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या माध्यमातून संघाच्या पदाधिकाऱ्यांना समाधानी करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू होती.