शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

होळीनिमित्त नागपूरहून मुंबई-पुण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 11:59 IST

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढलेली प्रतीक्षायादी आणि होळीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई व पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढलेली प्रतीक्षायादी आणि होळीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई व पुण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वेगाडी क्रमांक ०२०३२/०२०३१ नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर दरम्यान २ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२०३२ नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी गुरुवारी १२ मार्चला सायंकाळी ५.५० वाजता सुटेल. ही गाडी वर्धाला ७.०७, बडनेरा ८.४२, अकोला ९.४२, शेगाव रात्री १०.०३, मलकापूर १०.४३ आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवाशी शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२०३१ लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून बुधवारी ११ मार्चला रात्री १२.४५ वाजता सुटेल. ही गाडी शेगावला सकाळी ९.०८, अकोला ९.२३, बडनेरा ११.०३, वर्धा दुपारी १२.२८ आणि नागपूरला २.१० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एकूण २३ कोच आहेत. यात ३ तृतीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, १४ स्लिपर, ३ साधारण द्वितीय आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे.नागपूर-पुणे-नागपूर दरम्यानरेल्वेगाडी क्रमांक ०१४१६/०२४४७ दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येतील. रेल्वेगाडी क्रमांक ०१४१६ नागपूर-पुणे विशेष रेल्वेगाडी शनिवारी १४ मार्चला नागपूरवरून सकाळी ९.२० वाजता सुटेल. ही गाडी वर्धाला १०.५०, बडनेरा १२.४०, अकोला दुपारी १.३८, भुसावळ सायंकाळी ५.२५, मनमाड ७.४५, कोपरगाव ८.५३ आणि पुण्याला दुसºया दिवशी पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२०४७ पुणे-नागपूर विशेष रेल्वेगाडी पुण्यावरून शुक्रवारी १३ मार्चला सकाळी १०.४५ वाजता सुटेल. ही गाडी कोपरगावला दुपारी ३.५८, मनमाडला सायंकाळी ५.२०, भुसावळ ७.५०, अकोला ९.४७, बडनेरा रात्री ११.०७, वर्धाला रात्री १२.३२ आणि नागपूरला रात्री २ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एकूण २३ कोच आहेत. यात ३ तृतीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, १४ स्लिपर, ३ साधारण द्वितीय श्रेणी आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे