शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नागपूरहून मुंबई व गोवाकरिता विशेष रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हिवाळ्यात रेल्वेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि लांब प्रतीक्षा यादी पाहता रेल्वे प्रशासनाने अजनी-थिवीम-अजनी या ...

ठळक मुद्देनागपुर-मुंबईदरम्यान सहा फेऱ्या : हिवाळ्यात प्रवाशांना सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिवाळ्यात रेल्वेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि लांब प्रतीक्षा यादी पाहता रेल्वे प्रशासनाने अजनी-थिवीम-अजनी या दरम्यान वर्धा, पुलगांव आणि धामणगाव या मार्गावर साप्ताहिक विंटर स्पेशल रेल्वेच्या सहा फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नागपूर-मुंबईदरम्यान सहा फेºया राहणार आहेत.या अंतर्गत ०११९ अजनी-थिवीम विंटर स्पेशल रेल्वे अजनी येथून प्रत्येक सोमवारी (२४ डिसेंबर ते ७ जानेवारीपर्यंत) सायंकाळी ७.५० वाजता रवाना होऊन मंगळवारी रात्री ८.३० वाजता थिवीम येथे पोहचेल. विशेष रेल्वे सोमवारी वर्धा येथे रात्री ८.५० ला पोहोचून ८.५३ मिनिटांनी सुटेल. तसेच पुलगांव येथे रात्री ९.१६ वाजता पोहोचून ९.१८ वाजता प्रस्थान आणि धामणगांव येथे रात्री ९.३५ वाजता पोहोचून ९.३६ वाजता सुटणार आहे.याचप्रकारे ०११२० थिवीम-अजनी विंटर स्पेशल रेल्वे थिवीम येथून प्रत्येक मंगळवारी (२५ डिसेंबर ते ८ जानेवारीपर्यंत ) रात्री ११ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी बुधवारी नागपुरात रात्री १०.५० वाजता पोहोचणार आहे. विशेष रेल्वे प्रत्येक बुधवारला धामणगांव येथे रात्री ८.४८ वाजता पोहोचून ८.५० ला प्रस्थान, पुलगांव येथे रात्री ९.०८ वाजता पोहोचून ९.१० वाजता प्रस्थान आणि वर्धा येथे रात्री ९.४० ला पोहोचून ९.४३ ला सुटणार आहे.विशेष रेल्वे वर्धा, पुलगांव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ येथे थांबणार आहे. रेल्वेत एक एसी-२, एक एसी-३, १२ शयनयान, दोन द्वितीय साधारण आणि दोन एसएलआरसह १८ कोच राहणार आहेत.नागपूर-मुंबई-नागपूर विशेष रेल्वेविशेष रेल्वे नागपूर-मुंबई-नागपूर अशीही धावणार आहे. याअंतर्गत ०२०३२ नागपूर-मुुंबई विशेष विंटर रेल्वे नागपूर येथून प्रत्येक रविवारी (२३ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत) दुपारी ३ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहचेल. याचप्रकारे ०२०३१ मुंबई-नागपूर रेल्वे मुंबईहून प्रत्येक शनिवारी (२२ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत) रात्री १२.२० वाजता रवाना होऊन त्याचदिवशी दुपारी १.५५ वाजता नागपुरात येणार आहे. रेल्वे दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा येथे थांबेल. रेल्वेत १३ एसी-३, दोन एसएलआरसह एकूण १५ एलएचबी कोच राहतील.

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरgoaगोवा