शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केंव्हा?

By admin | Updated: October 16, 2015 03:13 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो भाविक नागपुरात येतात.

सुरक्षा यंत्रणेने घेतला धसका : भाविकांचीही होणार गैरसोयनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो भाविक नागपुरात येतात. सोहळा आटोपल्यानंतर त्यांच्या परतीच्या प्रवासाची तयारी सुरू होते. भाविकांचे लोंढेच्या लोंढे रेल्वेस्थानकाकडे परततात. भाविकांच्या गर्दीसाठी रेल्वे प्रशासन सोहळ्याच्या १० ते १२ दिवस आधी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करते. परंतु हा सोहळा सहा दिवसांवर आला असताना अद्याप एकाही रेल्वेगाडीची घोषणा न केल्यामुळे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणेने धसका घेतला असून भाविकांची गर्दी कशी आटोक्यात आणावी, असा प्रश्न सुरक्षा यंत्रणेला पडला आहे.धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. रेल्वे प्रशासन सर्वाधिक गर्दी असलेल्या मुंबई-पुणे मार्गावर विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करते. या रेल्वेगाड्यांमुळे भाविकांची मोठी सोय होते. भाविकांनाही लवकर रेल्वेगाड्या मिळाल्यामुळे रेल्वे सुरक्षा दल तसेच लोहमार्ग पोलिसांवरील कामाचा ताण कमी होतो. परंतु यावर्षी हा सोहळा सहा दिवसांवर आलेला असताना अद्यापही रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या संदर्भात भूमिका घेतली नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणेने त्याचा धसका घेतला आहे. रेल्वेस्थानकावर भाविकांची गर्दी झाल्यास त्याचा मनस्ताप सुरक्षा यंत्रणेलाच होणार आहे. दोन दिवसांपूर्वी लोहमार्ग पोलीस अप्पर महासंचालक डी. कनकरत्नम यांनी नागपूर आणि अजनी रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यातही त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. यावरून या विशेष रेल्वेगाड्या सुरक्षा यंत्रणेसाठी किती महत्त्वाच्या आहेत, याची कल्पना येते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लवकरच याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)