शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी रुग्णालयातील सुविधा तपासण्यासाठी विशेष समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 11:20 IST

जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा व विविध विकासकामांची तपासणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश गोगुलवार, मुद्देश्वर व आमले यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा व विविध विकासकामांची तपासणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली. समितीमध्ये डॉ. सतीश गोगुलवार, डॉ. एम. जी. मुद्देश्वर व डॉ. अरुण आमले यांचा समावेश करण्यात आला.समितीने सर्व सरकारी रुग्णालयांना वैयक्तिकरीत्या भेट देऊन सुविधा व विकासकामांची पाहणी करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा. रुग्णालय अधिकाऱ्यांनी समितीला पूर्ण सहकार्य करावे असे न्यायालयाने सांगितले.आरोग्य विभागाचे उपसंचालकांनी २७ जुलै २०१८ आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठात्यांनी ६ आॅगस्ट २०१८ रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून रुग्णालयांतील सुविधा व विकासकामांची माहिती दिली होती. त्याची तृतीय पक्षाकडून तपासणी करण्यासाठी सक्षम व्यक्तींची नावे सुचविण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, सरकारने वरील तिघांची नावे दिली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ वाघमारे यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. या याचिकेवर आता येत्या १० जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली.राज्य सरकारने सरकारी रुग्णालयांची परिस्थिती सुधारण्यासाठी कायापालट योजना तयार केली आहे. त्याअंतर्गत सरकारी रुग्णालयांची १५ निकषांच्या आधारे तपासणी करण्यात आली. त्यात वीज पुरवठा, पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिन्या, इमारत देखभाल, शवविच्छेदन कक्ष, स्वच्छता सेवा, रुग्ण तपासणी सुविधा, रक्तपेढी सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता, रुग्णांना अन्न पुरवठा, औषधांची उपलब्धता, रुग्णवाहिका, संचार सुविधा इत्यादी निकषांचा समावेश होता. त्यात विविध त्रुटी आढळून आल्या. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. एन. टी. ग्वालवंश यांनी कामकाज पाहिले.

सरकारी रुग्णालयात विविध समस्यानागपूर जिल्ह्यात सर्व प्रकारची १९६८ सरकारी रुग्णालये असून त्यात विविध प्रकारच्या समस्या आहेत. २०१८ मध्ये सरकारी रुग्णालयांत १४५३ डॉक्टरांची कमतरता होती. तसेच १४५२ रुग्णवाहिका बंद अवस्थेत होत्या. इतर समस्या पुढीलप्रमाणे असून त्यात किती सुधारणा झाली याची तपासणी समितीला करायची आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय