शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेसाठी विशेष मोहीम!

By admin | Updated: July 30, 2014 01:18 IST

राष्ट्रीय पीक विमा योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूर व रामटेक उपविभागीय कार्यालयाच्यातर्फे विशेष मोहीम राबविली जात आहे.

शेवटचे दोन दिवस : ३१ जुलै रोजी मुदत संपणार नागपूर : राष्ट्रीय पीक विमा योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूर व रामटेक उपविभागीय कार्यालयाच्यातर्फे विशेष मोहीम राबविली जात आहे. यात कृषी विभागाचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून, त्यांना योजनेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. तसेच गावागावातील ग्रामपंचायत कार्यालयात योजनेचे पोस्टर लावून, योजनेचा युद्धपातळीवर प्रचार-प्रसार केला जात आहे. यामुळे या योजनेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, गत आठवडाभरात शेकडो शेतकऱ्यांनी पीक विमा काढून, योजनेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे, या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत असून, त्याला आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत नागपूर व रामटेक उपविभागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा काढून योजनेचा लाभ घ्यावा, असे उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. दुष्काळ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ व गारपिट अशा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण कवच प्रदान करून, त्यांना नुकसानभरपाई मिळावी, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. यात शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, भात, ज्वारी, उडीद, मुग, तूर व भूईमुग अशा कोणत्याही पिकांचा विमा काढता येतो. यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या (सरासरी) उत्पादनांच्या १५० टक्क्यांपर्यंत विमा काढता येणार आहे.(प्रतिनिधी) नुकसानाची ४८ तासात माहिती कळवा विशेष म्हणजे, या योजनेत शेतकऱ्यांना फारच कमी विमा हप्ता भरायचा असून, एकूण विमा हप्त्यापैकी अर्धी रक्कम राज्य व केंद्र सरकारतर्फे जमा केली जाणार आहे. मात्र योजनेत सहभागी झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकांचे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास, त्याची संबंधित बँक किंवा भारतीय कृषी विमा कंपनीला ४८ तासात माहिती देणे अनिवार्य आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांनी त्याची तत्काळ संबंधित बँकेला माहिती द्यावी, असेही उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे यांनी आवाहन केले आहे.