शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम

By admin | Updated: June 21, 2015 02:56 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील दलालांच्या विरुद्ध कारवाई केल्यानंतर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आता आपला मोर्चा अवैध दारू धंद्यांकडे वळविला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती टाळणार नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील दलालांच्या विरुद्ध कारवाई केल्यानंतर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आता आपला मोर्चा अवैध दारू धंद्यांकडे वळविला आहे. मुबईतील मालाड मालवण येथे विषारी दारू पिऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेची पुनरावृत्ती आपल्या नागपुरात होऊ नये म्हणून याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नागपुरातील अवैध दारू धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेची सुरुवात तशी गेल्या शुक्रवारीच करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कुर्वे यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुरेंद्र मनपिया व निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली. आशिष दिवटे, शिवलाल गौर, आकाश सोनवाय, मनोज गौतेल यांच्या ताब्यातील १२२ लिटर मोहदारू व इतर साहित्यासह १०,०८२ रुपये किमतीचा माल तेव्हा जप्त करण्यात आला होता. दरम्यान, मुंबईतील मालाड मालवणची घटना घडली. तिथे हातभट्टीची दारू पिऊन तब्बल ८७ लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेची गंभीर दखल जिल्हाधिकारी कुर्वे यांनी घेतली आहे. नागपुरातही मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू काढली जाते. ही दारू आरोग्यासाठी अतिशय घातक असल्याने एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी अबकारी विभागांच्या अधिकाऱ्यांना यासंबंधात विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच हातभट्टीच्या दारूविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.