शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सत्य बोला आणि कर्तव्यरत राहा - राज्यपाल

By admin | Updated: March 9, 2017 22:42 IST

सत्य बोलणे हे आपले कर्तव्य असून माता-पिता व गुरुजनांचा नेहमी आदर करा, असा पारंपरिक उपदेश राज्यपाल तथा कुलपती

 ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 9 -  सत्य बोलणे हे आपले कर्तव्य असून माता-पिता व गुरुजनांचा नेहमी आदर करा, असा पारंपरिक उपदेश राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केला. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा ८ वा पदवीदान समारंभ गुरुवारी पार पडला. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या समारंभात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना  डॉक्टर आॅफ सायन्सह्ण ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.या समारंभात कुलपती या नात्याने राज्यपालांनी पदवी प्राप्त करणाऱ्या स्नातकांना पारंपरिक उपदेश केला. नेहमी खरे बोला, आपले कर्तव्य पार पाडा, जे शिक्षण प्राप्त केले आहे त्यापासून दूर जावू नका, आई-वडील- शिक्षक-अतिथी आणि देश यांना देव माना, असे कुलपती आपल्या पारंपरिक उपदेशात म्हणाले. विद्यार्थ्यांनी या उपदेशाचा आदर करुन पालन करावे, असेत्यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख पाहुणे म्हणून तर विद्यापीठाचे प्रति कुलपती तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, सरसंघचालाक डॉ. मोहन भागवत, कुलगुरु ए. के. मिश्रा व कुलसचिव डॉ. अ. स. बन्नाळीकर हे व्यासपीठावर होते. संचालन डॉ. शिरिष उपाध्ये व डॉ. सुनीत वानखेडे यांनी केले. या पदवीदान समारंभात राज्यातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.नागपूरच्या अश्वनी चाफलेने १०, मुंबईच्या शिवांगी पै ने ९ तर रोहीत सिंगने पटकाविली ७ पदकेयावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते पदवी व पदक प्रदान करण्यात आले. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या अश्विनी रमेश चापले (काटोल, नागपूर) या विद्यार्थिनीने शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी सहा सुवर्ण पदके व चार रौप्य पदके अशी एकूण १० पदके प्राप्त केली आहेत. तर २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शिवांगी देवदास पै या विद्यार्थिनीने आठ सुवर्ण व एक रौप्य पदकासह एकूण ९ पदके प्राप्त केली. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या रोहीत सिंग या विद्यार्थ्याने तीन सुवर्ण व चार रौप्य पदकासह एकूण सात पदके मिळविले आहेत. या विद्यार्थ्यांचा राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी गौरव केला.