शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सोय वऱ्हाडींची, गैरसोय विद्यार्थ्यांची

By admin | Updated: January 22, 2016 03:18 IST

राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या आयोजनाचा यंदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर

‘इंद्रधनुष्य’चे आज होणार उद्घाटन : खोल्यांसाठी कुडकुडत प्रतीक्षा, ब्लँकेट्ससाठी पायपीट नागपूर : राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या आयोजनाचा यंदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मान मिळाला आहे. ‘नॅक’तर्फे ‘अ’ दर्जा मिळालेले विद्यापीठ असल्याने राज्यभरातील विविध विद्यापीठांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगली सोय होईल, असे अपेक्षित होते. परंतु विद्यार्थ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला. अनेक विद्यार्थ्यांना बोचऱ्या थंडीत खोल्या मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली तर सायंकाळी उशिरा गादी व ब्लँकेट्ससाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरू असल्याचे दृश्य पहायला मिळाले. या असुविधेबाबत अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.‘इंद्रधनुष्य’चे शुक्रवार २२ जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवासाठी राज्यभरातील विद्यापीठांतील विद्यार्थी येथे विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. बाहेरील विद्यापीठांतील विद्यार्थी येण्यास गुरुवार दुपारपासूनच सुरुवात झाली. या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची असुविधा होऊ नये यासाठी रेल्वेस्थानकावरून ‘पिक अप’ची सोयदेखील करण्यात आली होती. काही कनिष्ठ कर्मचारी आमदार निवासात नोंदणीसाठी उपस्थितदेखील होते. परंतु आमदार निवास प्रशासनासोबत विद्यापीठातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याचे दिसून आले. गुरुवारी आमदार निवासातील प्रांगणात लग्नाच्या ‘रिसेप्शन’चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी काही खोल्या लग्नातील वऱ्हाड्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे दुपारी आलेल्या अकोला विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांची सोय तात्पुरती दुसऱ्या खोल्यांमध्ये करण्यात आली. रात्री खोल्या बदलून मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले. मुंबई येथील ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या विद्यार्थिनी गुरुवारी सायंकाळी पोहोचल्या. परंतु खोल्यांची सोय व्हायची असल्यामुळे या मुलींना सामानासह सुमारे पाऊण तास बोचऱ्या थंडीत बाहेरच बसावे लागले. दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची चमू दुपारच्या सुमारास आमदार निवासात पोहोचली. परंतु सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची सोय झालेली नव्हती. काही विद्यार्थ्यांनी खिशातील पैसे खर्च करून पोटपूजा केली. सायंकाळी विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था झाली. थंडीत विद्यार्थ्यांचे भागम्भाग !४नागपुरात या आठवड्यात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पांघरुणाच्या सोयीची विचारणा केली. परंतु अनेक विद्यापीठातील विद्यार्थी दुपारपासून येऊनदेखील त्यांना गाद्या, ब्लँकेट्स पुरविण्यात आले नव्हते. प्रवासामुळे थकलेले अनेक विद्यार्थी तसेच झोपी गेले. सायंकाळी अखेर विद्यापीठातील अधिकाऱ्यांना ही बाब कळल्यानंतर संबंधित सोय करण्यात आली. परंतु या गाद्या, ब्लँकेट्सदेखील विद्यार्थ्यांनाच उचलून न्यावे लागले. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.विद्यापीठाचा दावा, ‘आॅल इज वेल’विद्यापीठाचे माध्यम समन्वयक डॉ.श्याम धोंड यांना विचारणा केली असता विद्यापीठाने सर्व व्यवस्था चोख ठेवली असल्याचा त्यांनी दावा केला. गुरुवारी सायंकाळपर्यंत ११ विद्यापीठांच्या चमू पोहोचल्या होत्या. लग्नसमारंभासाठी खोल्यांचे ‘बुकिंग’ अगोदरपासून झाल्यामुळे काही खोल्या लगेच मिळाल्या नाहीत. परंतु यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली नाही अशी माहिती त्यांनी दिली. लग्नाच्या ‘बुकिंग’ची अगोदरपासून प्रशासनाला माहिती नव्हती का असा प्रश्न उपस्थित होत आहे.