नागपूर : महाराष्ट्र दिनी उपराजधानीत पालकमंत्र्यांनी ‘मेक इन नागपूर’चा संकल्प केला असताना विदर्भवाद्यांनी मात्र स्वतंत्र विदर्भाचा लोक जागर केला. शहरात शुक्रवारी विविध ठिकाणी धरणे, निदर्शने, मोर्चा काढून विदर्भ राज्याच्या मागणीकडे पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यात आले. ‘विदर्भ कनेक्ट’ या संघटनेने स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करीत ध्वजारोहण केले. इकडे व्हेरायटी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाण्याचा प्रयत्न करीत अटक करवून घेतली. भारिप बहुजन महासंघाने मोर्चा काढला. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तृतीयपंथीयसुद्धा मैदानात उतरले होते. त्यांनीही व्हेरायटी चौकात रास्ता रोको केला.काळा दिवस पाळला विदर्भ राज्य संघर्ष समितीने इतवारी शहीद चौक येथील विदर्भ चंडिका मंदिरात महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून साजरा केला. याप्रसंगी समितीचे केंद्रीय अध्यक्ष अण्णाजी राजेधर यांच्यासह उमेश चौबे, गणेश शर्मा, हरिभाऊ केदार, दिलीप बारापात्रे, घनशाम पुरोहित, उमेश निनावे, दीपक निलावार, जयवंत येवले, विजय कुमार शाहू, विनोदकुमार शहू, तेजिंदर सिंग रेणू, तुषार मंडलेकर, अनंत आष्टीकर आदी उपस्थित होते. शपथपत्राची होळी नाग विदर्भ आंदोलन समितीच्यावतीने सदर गांधी चौक येथे सकाळी १० वाजता स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी धरणे देण्यात आले. याप्रसंगी लोकसभा निवडणुकीच्यादरम्यान भाजपचे उमेदवार म्हणून नितीन गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या स्थापनेसंबंधात भरून दिलेल्या शपथपत्राची होळी करण्यात आली. समितीचे पदाधिकारी अहमद कादर, प्रभाकर कोंडबत्तुनवार, अक्षय भारती, तन्हा नागपुरी, राहुल थोरात, बबलू पठाण, आश पाटील, संगीता शर्मा आदी उपस्थित होते. सरकारविरोधात निदर्शनेनागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी व्हेरायटी चौकात धरणे आंदोलन करीत स्वतंत्र विदर्भ राज्याचा नारा दिला. तब्बल तासभर नारे निदर्शने करण्यात याली. यावेळी शासनाच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. भाजपच्या नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आपले आश्वासन न पाळल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुतळ्यांचे प्रतिकात्मक दहन करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुतळ्याचे दहन होऊ शकले नाही. पोलिसांनी पुतळा आपल्या ताब्यात घेतला आणि आंदोलकांना अटक केली. राम नेवले, अरुण केदार, अॅड. नंदा पराते, दिलीप नरवडिया, राजेश श्रीवास्तव, धर्मराज रेवतकर, प्रबीरकुमार चक्रवर्ती, विष्णू आष्टीकर, कृ.द. दाभोळकर, शाम वाघ, सुनील खंडेलवाल, अरविंद भोसले, दिलीप कोहळे, रामचंद्र देशमुख,अश्वजित पाटील आदींसह शेकडो कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग होता.(प्रतिनिधी)
आवाज विदर्भाचा
By admin | Updated: May 2, 2015 02:18 IST