शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ऑडिटरचे नाव घेताच १.४० लाखाने बिल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 23:33 IST

Corona Patient Harassment,Nagpur news खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांची लूट सुरू आहे. धंतोली येथील कोलंबिया हॉस्पिटलने एका ५७ वर्षीय महिला रुग्णाचे ६ दिवसाचे बिल १.८० लाख काढले होते. शासकीय दराच्या तुलनेत ही रक्कम अधिक होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी या संदर्भात मनपाच्या ऑडिटरकडे जाण्याची धमकी देताच बिल ४० हजार करण्यात आले.

ठळक मुद्देकोलंबिया हॉस्पिटलचे प्रकरण : कोविड रुग्णांकडून जादाची वसुलीमनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारीच हॉस्पिटलचे संचालक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांची लूट सुरू आहे. धंतोली येथील कोलंबिया हॉस्पिटलने एका ५७ वर्षीय महिला रुग्णाचे ६ दिवसाचे बिल १.८० लाख काढले होते. शासकीय दराच्या तुलनेत ही रक्कम अधिक होती. रुग्णाच्या नातेवाईकांनी या संदर्भात मनपाच्या ऑडिटरकडे जाण्याची धमकी देताच बिल ४० हजार करण्यात आले. विशेष म्हणजे या हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रवीण गंटावार हे मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी आहेत. त्यामुळे लोकांना नियम, कायदे सांगणारेच रुग्णांकडून अधिक बिल वसूल करीत आहेत. अशा परिस्थितीत अन्य खासगी रुग्णालयांना लगाम कोण घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.अंजिरा जुमडे या महिलेला कोलंबिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना दोन दिवस आईसीयू मध्ये तर चार दिवस सामान्य वॉर्डात ठेवले. परंतु संपूर्ण बिल आईसीयूचे लावण्यात आले. दररोज २५ हजाराप्रमाणे सहा दिवसाचे बिल १.५० लाख काढण्यात आले. अन्य खर्च जोडून १.८०लाख बिल आकारण्यात आले. आॅडिटरने बिल दुरुस्त करण्याची मागणी केली असता हॉस्पिटल व्यवस्थापनाने ६० हजार बिल भरण्यास सांगितले. आईसीयूचे दोन दिवसाचे १५ हजार तर सामान्य वॉर्डाचे चार दिवसाचे १६ हजार आकारण्यात आले.रुग्णाला दाखल करताना ६० हजार जमा करण्यात आले होते. नंतर हॉस्पिटलने २० हजार परत केले. रुग्णांच्या नातेवाईकांनी भाजप नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना यासंदर्भात फोनवरून माहिती दिली होती. त्यांनी आॅडिटरला बिल तपासण्यास सांगितले. परंतु शहरातील अन्य रुग्णांलयातही अशीच लूट सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी असाच पुढाकार घेण्याची गरज आहे.अतिरिक्त बिल वसूल केले नाही : गंटावाररुग्णाला भरती करताना ६० हजार जमा केले. डिस्चार्ज देताना ४० हजार रुपये बिल आकारण्यात आले. २० हजार परत केले. १.८० लाखाचे बिल रफ होते. आधी रुग्णाच्या नातेवाईकांनी विमा क्लेम असल्याचे सांगितले होते. नंतर मात्र पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे बिलात सुधारणा करण्यात आली. अतिरिक्त बिल वसुलण्यात आलेले नाही. अशी माहिती हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रवीण गंटावार यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल