शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोनीला हायकोर्टात जमा करावे लागणार २१.६० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:36 IST

चेक बाऊन्सप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या वेगवेगळ्या तीन आदेशानुसार ‘फार्मासिस्ट टाइम्स’ साप्ताहिकाचा मालक आरोपी अजय बद्रीनारायण सोनी याला .....

ठळक मुद्देचेक बाऊन्स प्रकरण :१० आॅक्टोबरला पुढील सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चेक बाऊन्सप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या वेगवेगळ्या तीन आदेशानुसार ‘फार्मासिस्ट टाइम्स’ साप्ताहिकाचा मालक आरोपी अजय बद्रीनारायण सोनी याला ६ आॅक्टोबर २०१७ पर्यंत एकूण २१ लाख ६० हजार १० रुपये उच्च न्यायालयाच्या प्रबंधक कार्यालयात जमा करावे लागणार आहेत.अमरावतीच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाच्या तीन आदेशांविरुद्ध सोनीने उच्च न्यायालयात तीन वेगवेगळे पुनर्विचार अर्ज दाखल केले होते. या अर्जांवरील सुनावणीदरम्यान सोनीने आपले वकील अ‍ॅड. पी. एस. तिवारी यांच्यामार्फत ६ आॅक्टोबरपर्यंत पैसे भरण्याची हमी दिल्याने, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्या एकलपीठाने २२ सप्टेंबर रोजी तीन वेगवेगळे आदेश दिले होते. त्यापैकी पहिल्या आदेशानुसार सोनीला ७ लाख ३२ हजार, दुसºया आदेशानुसार ९ लाख ४५ हजार ५०० आणि तिसºया आदेशानुसार ४ लाख ८२ हजार ५१० रुपये उच्च न्यायालयाच्या प्रबंधक कार्यालयात ६ आॅक्टोबरपर्यंत जमा करावे लागणार आहे. अमरावतीच्या मुधोळकरपेठ येथील डॉ. अल्का राजपुरिया यांनी आरोपी अजय सोनीविरुद्ध चेक बाऊन्सप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्टच्या कलम १३८ अन्वये तीन प्रकरणे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाºयाच्या विशेष न्यायालयामध्ये दाखल केली होती. या तिन्ही प्रकरणांवर १ डिसेंबर २०१६ रोजी न्यायालयाने डॉ. राजपुरिया यांच्या बाजूने वेगवेगळे निकाल दिले होते.सोनीने तिन्ही निकालांविरुद्ध सत्र न्यायालयात अपील दाखल केले असता, ११ सप्टेंबर २०१७ रोजी ते न्यायालयाने फेटाळून लावले होते. उच्च न्यायालयात सोनीच्या पुनर्विचार अर्जांवर १० आॅक्टोबर रोजी पुढची सुनावणी होणार आहे.