रोख, मोबाईल आणि कार जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत करणाऱ्या महाठग विजय रामदास गुरनुले याचा साथीदार ठगबाज सोनू ऊर्फ सुनील श्रीखंडे याच्या प्रेयसीला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल तसेच कार जप्त करण्यात आली.
महाठग श्रीखंडे यांची प्रेयसी श्वेता मौदा येथील रहिवासी आहे. हजारो नागरिकांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत करणारा ठगबाज श्रीखंडे प्रेयसी श्वेतावर लाखो रुपये उधळत होता. सोन्याचे दागिने, महागडा मोबाईल, लॅपटॉप, कार असे गिफ्टही देत होता. त्याने तिच्या बँक खात्यात लाखोंची रोकडही जमा केली होती. पोलिस तपासात उघड झाल्यानंतर शनिवारी श्रीखंडेला अटक करून पोलिसांनी रविवारी श्वेतालाही अटक केली. तिच्याकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, मोबाईल, लॅपटॉप आणि कार जप्त करण्यात आली.
---
वडिलांकडून ११ लाख जप्त
पोलिसांनी श्रीखंडेच्या वडिलांकडून ११ लाख रुपये जप्त केले. यापूर्वी त्याच्या भावाकडून पोलिसांनी ६९ लाख रुपये जप्त केले होते.